शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

गोवा विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून; विरोधक सरकारला घेरण्यासाठी सज्ज

By किशोर कुबल | Published: July 14, 2024 2:12 PM

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत असून ७ ॲागस्टपर्यंत चालणार आहे.

किशोर कुबल, पणजी :गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत असून ७ ॲागस्टपर्यंत चालणार आहे. म्हादई, कला अकादमी नूतनीकरणातील कथित घोटाळा, दरडी कोसळण्याच्या घटना, स्मार्ट सिटी, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच भ्रष्टाचार व इतर प्रश्नांवर विरोधी आमदार सरकारला घेरणार आहेत.

इंडिया आघाडीतील घटक कॉग्रेस, गोवा फॉरवर्ड तसेच आम आदमी पक्षाच्या मिळून सहा विरोधी आमदारांनी सरकारला वेगवेगळ्या विषयांवर कोंडीत पकडण्यासाठी संयुक्त रणनीत आखली आहे तर आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांची सरकारविरोधात स्वतंत्र रणनीती आहे.

अधिवेशनाचे एकूण कामकाज १८ दिवसांचे असणार आहे. म्हादईच्या बाबतीत कर्नाटकने घेतलेली आक्रमक भूमिका व गोवा सरकारला केंद्राकडे हा विषय मांडण्यात आलेले अपयश, आसगांव प्रकरणात लोकांचा पोलिसांवरील उडालेला विश्वास, मुरगांव बंदरातील कोळसा प्रदूषण, तामनार प्रकल्प, बिघडलेली कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर विरोधक आक्रमक आहेत. म्हादईबाबत कर्नाटकचा आगाऊपणा चालूच आहे. कळसा भंडुरा प्रकल्पाचा डीपीआर मागे घेण्याची मागणी करण्यासाठी सावंत सरकार अजून पंतप्रधान मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेऊ शकलेले नाही. याबद्दल विरोधी आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

एसटींना राजकीय आरक्षण देण्याच्या बाबतीत सरकार गंभीर नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :goaगोवाVidhan Bhavanविधान भवन