जवाहरलाल नेहरूंमुळे गोवामुक्तीस विलंब: शिवराज सिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 07:22 PM2019-08-18T19:22:28+5:302019-08-18T19:28:51+5:30

गोवा मुक्त करणे त्यावेळी केंद्र सरकारची जबाबदारी होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यासाठी काहीच केले नाही.

Goa liberation delay due to Jawaharlal Nehru: Shivraj Singh Chauhan | जवाहरलाल नेहरूंमुळे गोवामुक्तीस विलंब: शिवराज सिंह चौहान

जवाहरलाल नेहरूंमुळे गोवामुक्तीस विलंब: शिवराज सिंह चौहान

Next

पणजी : गोवा मुक्तीसाठी विलंब होण्याचे कारण हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असल्याचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते शिवराज सिंह चौहान यांनी भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 
 

चौहान म्हणाले, ‘भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगिजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यांतच राहिला. गोमंतकीय स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. गोवा मुक्त करणे त्यावेळी केंद्र सरकारची जबाबदारी होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यासाठी काहीच केले नाही’.  जी नीती गोव्याच्या बाबतीत वापरली तीच नीती नेहरूंनी काश्मीरच्या बाबतीत वापरली असे चौहान यांनी सांगितले. राजा हरिसंग यांनी काश्मीर भारतात सामाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही ३७० कलमांतर्गत विशेष दर्जा देऊन काश्मीर कायमचे लटकत ठेवण्यात आले. तसेच पाकिस्तानी काश्मीरवर हल्ला केल्यानंतर आपल्या सैनिकांनी त्यांना जबरजस्त उत्तर दिल्यामुळे त्यांना पिछेहाट करावी लागली. पाकीस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग आपले लष्कर पुन्हा मिळविण्याच्या मार्गावर असताना संयुक्त राष्ट्र संघात जाऊन युद्धबंदी करण्याची घाई नेहरूंनी केली. ही नीती देश विघटीत करण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. 


जे कॉंग्रेसला ७० वर्षांत जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ४८ तासात करून दाखविले आणि काश्मीरला लागू करण्यात आलेले ३७० कलम रद्द करून टाकले. या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण देशवासियांनी स्वागत केले असले तरी या मुद्यावर नेमकी कोणती भुमिका घ्यावी या बाबत कॉंग्रेस गोंधळात आहे. कॉंग्रेसचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्त्व्ये या मुद्द्यावर करीत आहेत
कॉंग्रेसने कलम ३७० मुद्द्यावर आपली भुमिका स्पष्ट करावी. पराभवानंतर अध्यक्षपदा सोडणाऱ्या  राहूल गांधी यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, परंतु कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या संबंधी भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. राहूल गांधी यांचा उल्लेख त्यांनी ‘रणछोडदास’ असा केला.

Web Title: Goa liberation delay due to Jawaharlal Nehru: Shivraj Singh Chauhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.