गोव्यात आता काँग्रेसचीही ‘गॅरेंटी’, म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढण्याचे आश्वासन

By किशोर कुबल | Published: April 21, 2024 02:42 PM2024-04-21T14:42:04+5:302024-04-21T14:42:54+5:30

Goa Lok Sabha Election 2024: गोवा प्रदेश कॉग्रेसने काल इंडिया अलायन्सच्या उमेदवारांसाठी २१ कलमी जाहिरनामा घोषित केला. म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढणार, कोळसा वाहतूक बंद करणार, सरकारी व खाजगी नोकय्रांमध्ये स्थानिकांना प्राधान्य आदी आश्वासने देण्यात आली आहेत.

Goa Lok Sabha Election 2024: In Goa, now Congress's 'guarantee', protection of Mhadai, promise to demolish all three controversial projects | गोव्यात आता काँग्रेसचीही ‘गॅरेंटी’, म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढण्याचे आश्वासन

गोव्यात आता काँग्रेसचीही ‘गॅरेंटी’, म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढण्याचे आश्वासन

- किशोर कुबल 
पणजी - गोवा प्रदेश कॉग्रेसने काल इंडिया अलायन्सच्या उमेदवारांसाठी २१ कलमी जाहिरनामा घोषित केला. म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढणार, कोळसा वाहतूक बंद करणार, सरकारी व खाजगी नोकय्रांमध्ये स्थानिकांना प्राधान्य आदी आश्वासने देण्यात आली आहेत. कॉग्रेस भवनात जाहिरनामा प्रकाशित करताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, दोन्ही उमेदवार अॅड. रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्ता तसेच आमदार कार्लुस फेरेरा उपस्थित होते.

कायदेशीर खाणी सुरु करणार, दाबोळी विमानतळ चालूच रहावा यासाठी उपाययोजना, आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणार, महिला सबलीकरणासाठी उद्योजकतेला प्रोत्साहन, महामार्गांलगत स्थानिक विक्रेत्यांसाठी विशेष विभाग, कारागीर तसेच खेळाडूंना प्रोत्साहन, पर्यटन क्षेत्राचा फेरआढावा घेऊन सुधारणा, पर्यावरणाभिमुख उद्योग, शैक्षणिक सुविधा वाढवणार, जमिनी विक्रीवर निर्बंध, फक्त गोवेकरांनाच जमिनी विकत घेता येणार, एसटींना राजकीय आरक्षण आदी आश्वासनेही जाहीरनाम्यात देण्यात आलेली आहेत.

तिन्ही प्रकल्प मोडीत काढणार - अमित पाटकर
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले कि,‘ रेल्वे दुपदरीकरण, अभयारण्यातून होणार असलेला राष्ट्रीय महामार्ग विस्तार व तामनार वीज प्रकल्प हे तिन्ही प्रकल्प केंद्रात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास मोडीत काढले जातील. सरकार भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली ते म्हणाले की, ४ कोटी रुपये खर्च करुन मेगा जॉब फेअर आयोजित केला. परंतु प्रत्यक्षात २५१ जणांनाच त्याही हंगामी नोकऱ्या मिळाल्या.’

गोवा हे अपघात, खुनांचे ‘डेस्टिनेशन’,  तर बलात्कारांची राजधानी : युरी
राज्यात दररोज अपघात होत आहेत. गोवा हे अपघात, खुनांचे डेस्टिनेशन तर बलात्कारांची राजधानी बनली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली. ते म्हणाले की, ‘सरकारी जावई असलेल्या कंत्राटदाराने महामार्गांचे काम अत्यंत निकृष्टरित्या केले. ‘रोड इंजिनीयरिंग’ योग्य प्रकारे झालेले नाही.

Web Title: Goa Lok Sabha Election 2024: In Goa, now Congress's 'guarantee', protection of Mhadai, promise to demolish all three controversial projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.