घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कदापि खपवून घेणार नाही - बाबू आजगांवकर
By किशोर कुबल | Published: April 29, 2024 01:48 PM2024-04-29T13:48:48+5:302024-04-29T13:48:48+5:30
Goa Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्य घटनेबाबत अनुद्गार काढून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिला.
- किशोर कुबल
पणजी - इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्य घटनेबाबत अनुद्गार काढून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिला.
पत्रकार परिषदेत आजगांवकर यांनी विरियातो यांचा कडक शब्दात निषेध केला. ते म्हणाले कि, ‘ गोवा मुक्तिनंतर राज्य घटना गोवेकरांवर लादली गेल्याचे विरियातो यांचे विधान संतापजनक आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आदी सर्वचजण त्यांच्या या विधानामुळे दुखावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या घटनेवर बोलण्याचा तसेच ती बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही. असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.’
आजगांवकर म्हणाले कि,‘आज घटनेमुळे लोकशाही आहे आणि जगभरात भारतातील लोकशाहीचे कौतुक आहे. बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आम्ही आमदार बनू शकलो. मी चार वेळा आमदार बनलो. पेडणे मतदारसंघात मुक्तीनंतरही पाणी, वीज, रस्ते नव्हते. आमदार व मंत्री बनून पेडणेचा विकास केला. पत्रकार परिषदेस प्रदेश भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष सिध्देश पेडणेकर, सरचिटणीस दत्ताराम पेडणेकर व विद्याधर आर्लेकर उपस्थित होते.