दिगंबर कामत यांनी केला मतमाेजणी केंद्रात प्रवेश, कॉंग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
By पूजा प्रभूगावकर | Published: June 4, 2024 12:36 PM2024-06-04T12:36:59+5:302024-06-04T12:38:12+5:30
Goa Lok Sabha Election 2024 result : दक्षिण गोवा मतमोजणी केंद्रात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना बेकायदेशीरपणे प्रवेश दिला.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: दक्षिण गोवा मतमोजणी केंद्रात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना बेकायदेशीरपणे प्रवेश दिला. सदर प्रकार हा निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप कामत यांना प्रवेश देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करावे अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
याविरोधात कॉंग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांनी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मतमोजणी केंद्रात मतदान सुरु असताना कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र असे असतानाही मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आत प्रवेश देणे हे धक्कादायक असल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे.
सदर, प्रकार हा केवळ निवडणूक आचारसंहितेचेच नव्हे तर मुख्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शकतत्वांचेही उल्लंघन ठरते. तसेच भाजपच्या उमेदवाराच्या प्रती निवडणूक आयोगा पक्षपाती असल्याचीही शंका उपस्थित होत असल्याचेही कॉंग्रेसने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.