नारायण गावस
पणजी: मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजपचे उमेदवार एका लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल असा आत्मविश्वास आहे तर या पेक्षा कमी मते मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. भाजपकडू्न इंडिया आघाडीला कमी दाखविण्याचा हा प्रकार असून इंडिया आघाडीचे नेते एकत्र असून २०२७ विधानसभेच्या निवडणूकांची ही नांदी आहे, असे आम आदमी पक्षाचे समन्वय ॲड. अमित पालेकर यांनी गुरुवार आपच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत आपचे नेत वाल्मिकी नाईक व इतर उपस्थित होते.
ॲड. अमित पालेकर म्हणाले, भाजप दक्षिण गोव्यात तसेच उत्तर गोव्यातील उमेदवार जिंकणार नाही याची भिती होती म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिवस रात्र झाेपडपट्टी परिसरही प्रचारासाठी पिंजून काढला. यंदा त्यांना लोकांकडून जास्त मते मिळणार नाही याची भिती हाेती. म्हणून खास दिल्लीतून माेठ्या नेत्यांना गोव्यात प्रचारासाठी बोलाविले होते. आता जर मुख्यमंत्री दोन्ही उमेदवार बहुमतांनी जिंकणार असे बाेलत आहे जर कमी मते पडली तर याची जबाबादारी स्वीकारुन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. लोकांना फक्त धर्म जातीवर विभाजन करण्याचे काम हे भाजपने केले आहे. जाती धर्माच्या नावाने त्यांनी मते मागितली आहे.
आरजी हा भाजपचा घटकआरजी ही फक्त भाजपची बी टीम नसून ताे भाजपचाच घटक आहे. त्यांनी फक्त मते विभाजन करण्याचा डाव रचला होता. पण यंदा अनेक लोकांना त्यांचा हा डाव कळल्याने त्यांना लोकांनी मतदान केले नाही. आपल्याकडे पैसे नाही असे सांगणाऱ्या या पक्षाने निवडणूक कशी लढविली हा ही प्रश्न आहे. फक़्त गोमंतकीयांची मते विभाजन करण्याचे काम आरजीने केले आहे, असा आरोपही ॲड. पालेकर यांनी केला आहे.