पणजी: गोव्यातील खनिज खाण प्रश्नावर येत्या डिसेंबर महिन्यार्पयत केंद्र सरकार तोडगा काढील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तशी ग्वाही दिली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले.
प्रमोद सावंत यांनी दिल्लीत गुरुवारी दुपारी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी गोव्यासह अन्य मोठय़ा राज्यांतील खनिज खाणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्र्यांची जी समिती नेमली आहे, त्या समितीचे अध्यक्षपद शहा यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर लोकमतला सांगितले की, आपण शहा यांना भेटलो तेव्हा केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी तसेच केंद्रीय खाण सचिवही उपस्थित होते. गोव्यातील खाणप्रश्न सोडविण्याबाबत केंद्र सरकार पूर्णपणो सकारात्मक आहे. खाणी नव्याने सुरू व्हायला हव्यात असे केंद्र सरकारला वाटते. त्यामुळे येत्या डिसेंबर्पयत तोडगा निघण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तसेच अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील समितीची दुसरी बैठक कधी होईल, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, बैठकीतच यापुढे गोव्याच्या खाणप्रश्नी निर्णय होईल. एकूण दोन पर्याय केंद्राने विचारात घेतले आहेत. एक तर कायदा दुरुस्त करण्यासारखा वैधानिक किंवा राजकीय स्वरुपाचा निर्णय किंवा न्यायालयात जाण्याचा निर्णय यापैकी एखादा पर्याय केंद्र सरकार स्वीकारील. केंद्रीय मंत्र्यांच्या गटाची लवकरच बैठक होईल.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वन व पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांचीही भेट घेतली व विविध विषयांबाबत चर्चा केली. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांचीही मुख्यमंत्री सावंत यांनी भेट घेतली. राज्याने यापूर्वी खाण बंदीच्या पाश्र्वभूमीवर केंद्राकडे सुमारे दीड ते दोन हजार रुपयांचे आर्थिक पॅकेज मागितले आहे. पूरग्रस्तांसाठीही गोव्याने केंद्राकडे मदत मागितली होती पण अजून मिळालेली नाही.