- पूजा नाईक प्रभूगावकर पणजी - मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दक्षिण नॉर्वेमधील क्रिस्टियनसँड येथे आयोजित आगदार इंडिया बिझनेस परिषदेत भाग घेऊन तेथील उपस्थितांना मार्गदर्शन केले. गोवासरकारचे मत्स्य व्यवसाय धोरण तसेच मच्छिमारांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गोव्यात मत्स शेती विकसित करण्याच्या उद्देशाने मत्स्यपालन क्षेत्रात काम करणाऱ्या नॉर्वे येथील उद्योगांना, विशेषत: सॅल्मन फार्मिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणे हा आमचा आगदार इंडिया बिझनेस परिषदेत भाग घेण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री हळर्णकर यांनी नमूद केले.
जागतिक महासागर तंत्रज्ञान (जीओटी), मंडल शिपयार्डच्या शिष्टमंडळासाठी बिझनेस रिजन क्रिस्टियनसँड येथे साईट व्हिजीट आयोजित केली होती. याठिकाणी ६७ मीटरच्या अत्याधुनिक आणि मोठ्या मासेमारी बोटी आहेत. त्यापैकी एक (सिले मेरी) वर फिश प्रोसेसिंग युनिट असून त्यालाही शिष्टमंडळाने भेट दिली. मासळी साठ्याचे मूल्यांकन तसेच सागरी परिसंस्थेचे मूलभूत संशोधन, मत्स्यपालन, पोषण, अन्न सुरक्षा आणि प्राणी कल्याण यांची माहिती शिष्टमंडळाला दिली.