नारायण गावस - पणजी : गोव्यात माेठ्या प्रमाणात आराेग्य क्षेत्रात क्रांती होत असून, पुढील ६ महिन्यांत गाेवा मॉडेल देशभर प्रसिद्ध हाेणार आहे. गाेव्यात अनेक आधुनिक उपचार पद्धती राबविल्या जाणार आहेत, असे आराेग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. शुक्रवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ मोफत उपचार पद्धतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बाेलत होते. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर वरिष्ठ डॉक्टरही उपस्थित होते, तसेच या उपचाराचा लाभ घेण्यासाठी काही मुले नसलेली जाेडपीही उपस्थित होती.
काही अन्य पक्षाचे राजकारणी गोव्यात येऊन दिल्ली मॉडेलचे राजकारण करत आहे; पण गाेवा हे दिल्लीपेक्षा आरोग्य क्षेत्रात खूप पुढे आहे. आयव्हीएफ उपचार मोफत देणारे गाेवा हे पहिले राज्य आहे. फक्त देशातच नाही जगभर हा उपचार कुठेच माेफत दिला जात नाही. या उपचारासाठी लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत; पण गाेवा सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने गाेव्यात ही उपचार पद्धतीत सुरू केली आहे. फक्त बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयात नाही तर आता सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये अशा आधुनिक आराेग्य सुविधा सुरू केल्या जाणार आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
- आयव्हीएफचा मोफत उपचार देणारे पहिले राज्यज्या जाेडप्यांना मुले नाही वंध्यत्वाचा सामना करावा लागतो अशा जोडप्यांच्या चेहऱ्यावर आता हास् फुलणार आहे. आज अनेक जाेडपी या ठिकाणी सरकारच्या आराेग्य क्षेत्रावर विश्वास ठेवून आली आहे. त्यांना नक्कीच या उपचाराचा लाभ हाेणार आहे. या उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाेडप्यांना उपचारासाठी लाखाला रुपये खर्च करावा लागत होता; पण आता हा उपचार सरकार मोफत देत आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत, तसेच या विषयी जास्त माहिती जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाइन नंबरही दिला जाणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.