पणजी: महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे व महाआघाडी स्थापन करावी असा प्रस्ताव खासदार संजय राऊत यांनी पुढे आणला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मगो या तीन पक्षांनी मिळून कथित आघाडीच्या स्थापनेचा फुगा जवजवळ फोडून टाकला आहे.
आपण शिवसेनेसोबत जाणार नाही अशी भूमिका पाच आमदार असलेल्या काँग्रेस पक्षाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी घेतली. मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी तर काँग्रेस जोर्पयत तयार होणार नाही तोर्पयत गोव्यात विरोधकांची आघाडी स्थापनच होऊ शकत नाही असे सांगत स्वत:ची भूमिका स्पष्ट केली.
गोवा म्हणजे महाराष्ट्र नव्हे अशा प्रकारची टीका काँग्रेसचे गोव्यातील काही पदाधिकारी संजय राऊत यांच्यावर करू लागले आहेत. गोव्यात आठ महिन्यांपूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार अधिकारावर आले. या सरकारचा मुकाबला करण्यासाठी व प्रसंगी हे सरकार खाली पाडण्यासाठी आपण गोव्यातील विरोधकांची महाघाडी स्थापन करायला हवी, अशी भूमिका शिवसेनेचे नेते राऊत यांनी मांडली होती.
शिवसेनेकडे गोव्यात एकही आमदार नाही पण विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षाकडे पाच आमदार आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे आणि मगो पक्षाकडेही एक आमदार आहे. या तिन्ही पक्षांनी शिवसेनेसोबत जाण्याविषयी नकारात्मक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने तर विरोधकांच्या आघाडीचा प्रस्ताव थेट धुडकावून लावला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी स्पष्ट विधाने केली.
गोवा फॉरवर्ड पक्ष व आम्ही समविचारी नव्हे, असे ते म्हणाले. गोवा फॉरवर्ड हा एकमेव पक्ष शिवसेनेसोबत आहे. फॉरवर्डकडे फक्त तीन आमदार आहेत. मगोपचे आमदार ढवळीकर यांनी तर आपण अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात गोव्याविषयी काय आहे ते जाणून घेईन, तत्पूर्वी आपण आघाडीसोबत जाऊ शकत नाही असे लोकमतला सांगितले.
चर्चिल आलेमाव यांनी तर विरोधकांची आघाडी स्थापन करू पाहणाऱ्यांना थेट मोठ्या टीकेचे लक्ष्य बनविले. जे मनोहर पर्रीकर यांना विरोध करत नव्हते ते आता स्वार्थासाठी प्रमोद सावंत यांना विरोध करत आहेत, अशी टीका आलेमाव यांनी केली. सरकार पाडण्याची आमची योजनाच नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा म्हणाले. एकंदरीत गोव्यात आघाडीच्या प्रस्तावाचा प्रयोग आकार घेण्यापूर्वीच फसल्यात जमा आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी शिवसेनेसोबत गोव्यात कुणी आघाडी स्थापन करणो म्हणजे मोठा राजकीय विनोद आहे अशा शब्दांत खिल्ली उडवली तर भाजपचे मंत्री विश्वजित राणो यांनी सेनेसोबत जाणो म्हणजे राजकीय आत्महत्त्या ठरेल हे विरोधकांनी लक्षात घ्यावे असा सल्ला दिला. अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी माङयाकडे विरोधकांच्या आघाडीचा प्रस्ताव कुणीच आणला नाही, प्रस्ताव आल्यानंतर बोलू असे सांगितले.