शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास विक्रमाला घातली गवसणी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
5
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
6
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
7
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
8
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
9
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
10
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
11
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
12
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
13
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
14
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
16
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
17
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
18
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
19
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
20
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले

खाण व्यवसाय सुरू करण्यासंबंधी गोव्याच्या खासदारांचे पंतप्रधानांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 8:34 PM

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मडगाव: बंद असलेला गोव्यातील खाण व्यवसाय  विनाविलंब सुरू करावा अशी मागणी या राज्याचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आज  गुरुवारी सार्दीन यांनी मडगावात पत्रकार परिेषद घेऊन ही माहिती दिली. खाण व्यवसाय हा गोव्याचा आर्थिक कणा आहे. गोवा मुक्तीपूर्वीपासून राज्याच्या अर्थव्यवस्थेतील हा महत्वाचा घटक आहे, मोदी यांनी लक्ष घालून हा खाण व्यवसाय पुन्हा सुरू करावा, अशी मागणी सार्दीन यांनी केली आहे.दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. खाण व्यवसाय ठप्प असल्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांची हाल झालेले आहे याकडेही सार्दीन यांनी लक्ष वेधले.  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे खाण व्यवसाय आज सुरु होणार उद्या सुरू होणार, असे केवळ आश्वासने देत आहेत. भाजपा हा केवळ आश्वासने देतो प्रत्यक्षात काहीच करीत नाहीत असा टोलाही त्यांनी हाणला. खाण व्यवसाय बंद असल्याने राज्याची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यावर त्वरित उपाययोजना आखून खाण व्यवसाय सुरू करावा अशी मागणी खासदार सार्दीन यांनी केली आहे.सद्या राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या फैलावाबद्दल सार्दीन यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ या रुग्णांवर उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वेगळ्या खोली उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. डेंग्यू म्हणजे मलेरिया नव्हे असे सांगताना डेंग्यूचे निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांमध्ये जागृतीची गरज त्यांनी व्यक्त केली. डेंग्यूचा प्रसार झालेली ठिकाणे शोधून काढून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची मागणीही त्यांनी केली.