पणजी : मुंबईतील शहर वाहतूक पोलीस खात्याने अवजड आणि खासगी बस वाहतुकीला (ट्रॅव्हल्स) वेळेचे बंधन घातल्याने, गोवा-मुंबई खासगी बसचे भाडे निम्म्यावर आले आहे. गोव्यातून मुंबई बस नवी मुंबईपर्यंतच येत आहेत.गोव्यातून मुंबईला जाणा-या खासगी बस वाहतुकीवर बंदीचा मोठा परिणाम झाला आहे. गोव्यातून मुंबई सेंट्रलपर्यंत जाणाºया खासगी बसेस वाशीपर्यंतच (नवी मुंबई) जातात. गोवा ते मुंबई साध्या बसचे तिकीट सहाशे ते आठशे रुपये आहे, ते ४५० रुपये झाले आहे. विशेष म्हणजे, पुण्यापर्यंत या सेवेचा तिकीट दर ३५० असा आहे, तसेच स्लीपर कोच मुंबईपर्यंतचे (वाशी) बसचे तिकीट दर ७०० रुपये आहे, तर पुण्यापर्यंतचे तिकीट दर ६०० ते ६५० रुपये आहे, असे एका खासगी कंपनीने सांगितले.मुंबईतील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने आणि खासगी बसेसना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे मुंबई खासगी बस वाहतूक संघटनेने संप पुकारला आहे. १९ सप्टेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.पुण्यापर्यंत या सेवेचा तिकीट दर ३५० असा आहे, तसेच स्लीपर कोच मुंबईपर्यंतचे (वाशी) बसचे तिकीट दर ७०० रुपये आहे, तर पुण्यापर्यंतचे तिकीट दर ६०० ते ६५० रुपये आहे, असे एका खासगी कंपनीने सांगितले.
खासगी बस वाहतुकीला (ट्रॅव्हल्स) वेळेचे बंधन घातल्याने गोवा-मुंबई बस तिकीट निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:10 AM