वास्को - गोव्याच्या मुरगाव तालुक्यात जानेवारी महिन्यात विविध वाईट तसेच चांगल्या घटना घडल्याने नवीन वर्षाचा पहिला महिना मुरगाव तालुक्यासाठी ‘थोडी खुशी थोडा गम’ असा गेला. वास्को शहरातील विविध भागात चार वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेत लाखो रुपयांची नुकसानी झाली. तसेच तीन चोरी प्रकरणात चोरट्यांनी लाखो रुपयांची मालमत्ता लंपास केली व गोव्यातील नामावंत गझल गायक दिलीप डोंगरीकर हा ट्रकखाली सापडल्याने त्याचा दुर्देवी अंत झाला असून याबरोबरच अन्य काही वाईट घटना मुरगाव तालुक्यात घडल्या. या महिन्यात अनेक वाईट घटना घडल्या तरी बऱ्याच वर्षापासून मुरगाव तालुक्यात एक उत्तम सरकारी इस्पितळ पाहीजे असलेली नागरीकांची मागणी शेवटी पूर्ण होत चिखली उपजिल्हा इस्पितळाचे नुकतेच उद्घाटन झाल्याने तसेच अन्य काही प्रकल्पांची उद्घाटने झाल्याने जानेवारी महिना काहीसा चांगलाही गेला.नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर जानेवारी महीन्याच्या सुरवातीपासून अजून पर्यंत मुरगाव तालुक्यात अनेक वाईट घटना घडल्याने हा महीना तेवढा चांगला गेला नसल्याचे दिसून आले. वास्कोतील तीन वेगवेगळ््या भागात असलेल्या घरांना आग लागून यात त्या घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ३ जानेवारीला रात्रीच्या वेळी बायणा, वास्को भागात राहणा-या आलेक्स डी’सोझा यांच्या घराला आग लागून त्यांच्या घराच्या दोन खोल्या सामानासहीत पूर्णपणे जळून खाक झाल्याने त्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. ही आगीची घटना घडून ८ दिवसानंतर ११ जानेवारी रोजी रात्रीच्याच वेळी बायणा, वास्को भागात राहणाºया अहमद शेख याच्या घराला लागलेल्या भयंकर आगीत घरात असलेले सोन्याचे ऐवज, रोख रक्कम, विविध सामग्री याच्यासहीत पूर्ण घरच जळून भस्म झाल्याने ह्या कुटूंबाला शेजाºयांच्या घरात राहण्याची पाळी आली होती. ह्या घटनेत शेख यांच्या घरात असलेल्या गॅस सिलिंण्डरचा सुद्धा स्फोट झाला, मात्र सुदैवाने यात कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही. ह्या घटनेत शेख कुटूंबियांना सात लाखाहून जास्त रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज तेव्हा व्यक्त करण्यात आला होता. यानंतर नवेवाडे भागात भाड्याने राहणाºया ललीता नारायण हीच्या घराला १५ जानेवारीला आग लागून तिच्या घरातील सुमारे साडेतीन लाख रुपयांची मालमत्त जळून खाक झाली. यात तिच्या घराच्या छप्पराची मोठी नुकसानी झाली होती. वरील तिनही घरांना ज्यावेळी आग लागली त्यावेळी घरात कोणीही नसल्याने सुदैवाने येथे होणारा मोठा अनर्थ टळला. २५ जानेवारी ला दुपारी ड्रायव्हरहील, वास्को भागात खुल्या जागेत साठा करून ठेवलेल्या बांबूंच्या ढीगाला भयंकर आगीने पेट घेतल्याने येथे उभ्या करून ठेवलेल्या २ चारचाकी व १ दुचाकीची मोठी नुकसानी झाली. वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी ह्या आगीच्या घटनेच्यावेळी अचुक पावले उचलून ह्या भागातील लाखो रुपयांची मालमत्ता वाचवली.२१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास आपल्या मित्राच्या दुचाकीवरून जात असताना गोव्यातील प्रसिद्ध गझल गायक दिलीप डोंगरीकर (वय ६४) हा वास्को शहरातील जंक्शनसमोर ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्देवी अंत झाला. दाबोळी मतदारसंघात अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ््या ठिकाणी चोरी करून ५४ लाखाहून जास्त रुपयांची मालमत्ता लंपास केली. दाबोळीतील कृष्णा हेगडे यांचे कुटूंब गोव्याबाहेर गेल्याची संधी चोरट्यांनी साधून त्यांच्या बंगल्यातील सोन्याचे ऐवज, रोख रक्कम इत्यादी मालमत्ता लंपास केली. ह्याच दिवशी वाडे, दाबोळी भागात राहणाºया तुळशीदास मोरजकर याच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घुसून त्यांच्या घरात असलेले सोन्याचे ऐवज, रोख रक्कम मिळून सुमारे चार लाख रुपयांची मालमत्ता येथून लंपास केली. ह्या दोन्ही प्रकरणातील चोरट्यांना गजाआड करण्यास वास्को पोलीसांना अजून अपयश आले असून ह्या प्रकरणाचा तपास चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले. वेर्णा भागातील औद्योगिक वसाहतीतून चोरट्यांनी एक लाख रुपयांच्या किमतीच्या विद्युत वाहिन्या लंपास केलेल्या प्रकरणात वेर्णा पोलीसांनी त्या संशयित चोरट्याला गजाआड करून चोरीचे सामान जप्त केले. ह्या महिन्यात वास्को शहरातील काही नागरीक संतप्त होऊन त्यांनी आल्फे्रड आल्मेदा नावाच्या एका व्यक्तीच्या वाहनाची मोडतोड केल्याची घटना घडली. वाहतूक कायद्याचे कोण उल्लंघन करीत असल्यास, सामान्य नागरीकाने त्याचे छायाचित्र काढून वाहतूक पोलीसांना पाठवावे व ज्याने उल्लंघन केले आहे त्याला दंड मिळतो अशी ‘ट्राफीक सेंन्टीनल’ नावाने सरकारने योजना काढली आहे. जानेवारी महिन्यात यानुसार शेकडो वास्को नागरीकांना कायद्याचे उल्लंघन केल्याने दंड आले असून हे काम आल्फ्रेड आल्मेदा हा युवक करत असल्याचा संशन काही नागरीकांना आल्यानंतर त्यांनी २३ जानेवारीला त्याच्या चारचाकी वाहनाची मोठी तोडफोड केली. ह्या प्रकरणात दोघा तरुणांना सुद्धा अटक करण्यात आली असून काहींचा शोध चालू आहे. याबरोबरच जानेवारीत अन्य काही वाईट घटना घडल्या ज्यात एका तरुणाने वाहतूक पोलीसांशी दादागीरी केल्याने त्याला अटक करण्यात आले इत्यादी. जानेवारी महिना विविध वाईट घटनामुळे मुरगाव तालुक्यासाठी तेवढा चांगला महिना ठरला नसला तरी या भागातील काही महत्वपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे लोकात आनंद व्यक्त करण्यात आला. मुरगाव तालुक्यातील चार महत्वपूर्ण (वास्को, दाबोळी, मुरगाव व कुठ्ठाळी) मतदारसंघासाठी एक उत्कृष्ठ अशा सरकारी इस्पितळाची लोकांची अनेक वर्षापासून मागणी होती. २५ जानेवारीला चिखली उपजिल्हा इस्पितळाचे उद्घाटन झाले असून यामुळे भविष्यात रुग्णांना चांगली सरकारी वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचा विश्वास नागरीकात निर्माण झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. तसेच ह्या महिन्यात कुठ्ठाळी भागातील उत्कृष्ट अशा मार्केट इमारत प्रकल्पाचे व अन्य काही चांगल्या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याने जानेवारी महिना मुरगावसाठी ‘थोडी खुशी थोडा गम’ असा ठरला असे म्हणायला हरकत नाही.
जानेवारी महिना मुरगाव तालुक्यासाठी ठरला ‘थोडी खुशी थोडा गम’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 5:26 PM