पणजी : गोव्यात कोविद इस्पितळात उपचार घेणा:या एकूण 47 पैकी 9 रुग्ण शुक्रवारी उपचारानंतर ठीक झाले. त्यांना पुढील 12 तासांत डिस्चार्ज देऊन चौदा दिवस सरकारी सुविधेच्या ठिकाणी निगराणीखाली ठेवले जाणार आहे. दुसऱ्या बाजूने शुक्रवारी गोव्यात पाच नवे कोरोना रुग्ण आढळले. हे पाचहीजण मुंबईहून आलेले आहेत. त्यांची ट्रनेट पद्धतीने चाचणी केली गेली तेव्हा ते पॉझिटीव्ह आढळले.
मडगाव येथील कोविद इस्पितळात एकूण 47 रुग्ण उपचार घेत आहेत. तिथे अनेक डॉक्टरांची पथके उपचार प्रक्रियेत भाग घेतात. इस्पितळातील खाटांची संख्या नुकतीच दोनशेर्पयत वाढविण्यात आली आहे. कोविद इस्पितळातील नऊ रुग्ण शुक्रवारी ठीक झाले. त्यांची कोविद चाचणी सलग दोनवेळा निगेटीव्ह आली. त्यामुळे त्यांना आता डिस्चार्ज देण्यास हरकत नाही असे आरोग्य यंत्रणोशीसंबंधित अधिका:यांनी लोकमतला सांगितले. मात्र त्यांना चौदा दिवस निगराणीखाली रहावे लागेल. गोव्यात गेल्या फेब्रुवारीत प्रथम सात कोरोना रुग्ण सापडले होते. ते सातही रुग्ण कोविद इस्पितळात झालेल्या उपचारानंतर ठीक होऊन घरी गेली. डॉ. एडवीन गोम्स व अन्य डॉक्टरांच्या पथकाला याबाबत सरकारने श्रेय दिले होते. नौदलाने हेलिकॉप्टरमधून कोविद इस्पितळावर व गोमेकॉ इस्पितळावर पुष्पवृष्टीही केली होती. आता आणखी नऊ कोरोना रुग्ण उपचारानंतर ठीक झाले.दरम्यान, शुक्रवारी तिघेजण मुंबईहून बसमधून गोव्यात आले होते. ट्रनेट चाचणीवेळी ते कोरोना पॉङिाटीव्ह सापडले. तत्पूर्वी शुक्रवारीच सकाळी एका महिलेसह दोघेजण गोव्यात कोरोनाग्रस्त आढळून आले. हे दोघेही मुंबईतूनच पण रेल्वेने आले होते.