शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

Goa: डुक्कराची उघड्यावर कत्तल करून विक्री, धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 6:31 PM

Goa News: पेटके धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पासून सुमारे ५० मीटर अंतरावर डुक्कराची उघड्यावर कत्तल करून त्याचे परस्पर वितरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

- अजय बुवा फोंडा (गोवा)  -  पेटके धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पासून सुमारे ५० मीटर अंतरावर डुक्कराची उघड्यावर कत्तल करून त्याचे परस्पर वितरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा प्रकार स्थानिक युवकांनी वन खात्याच्या नजरेस आणून दिला. मुख्य बाब म्हणजे येथे कत्तल करण्यासाठी चक्क  आंध्र प्रदेश मधून डुक्कर आणण्यात आले होते.सदरची कत्तल करून घरगुती डुक्कराचे मास हे रानटी डुक्कराचे मास म्हणून विकले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वृत्तानुसार मनुष्य वस्ती पासून लांब असलेल्या या परिसरात खुलेआम कत्तल खाना चालू होता.गेल्या २-३ वर्षापासून सदर प्रकार सुरू आहे. मंगळवारी सदर ठिकाणावर धाड घातली असता त्या ठिकाणी डुकरांची कत्तल होत असल्याचे आढळून आले. वन खात्याने एक रिक्षा तसेच ८० किलो डुक्कराचे मास जप्त करून दोघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काही संशयितांनी जंगलातून पळ काढला. मंजुनाथ दोडामणी व बसावा दोडामणी याना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यानी १४ जिवंत डुक्करावर उपचार करण्यासाठी त्यांच्या रवानगी बोंडला येथील प्राणी संग्रहालयात केली आहे.

पेटके येथे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना परिसरात दुर्गंधी येत होती. स्थानिक युवकांनी यासंबधी काहीतरी काळेबेरे होत असल्याचा संशय येत होता. सतर्क राहून परिसरात बेकायदेशीर सुरू असलेल्या डुक्कराच्या कत्तलीचा प्रकार मंगळवारी सकाळी  त्यानी उघडकीस आणला. सदर युवकांनी स्थानिक पंच महेश नाईक व सरपंच बालाजी गावस यांना माहिती दिल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. कुळे वन विभागाचे अधिकारी नारायण प्रभुदेसाई व इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची तपासणी केली. त्यावेळी घटनास्थळी ४ कत्तल केलेले डुक्कर व १४ जिवंत डुक्कर आढळून आले. पशु संवर्धन खात्याचे डॉ. केतन चौघुले यांनी डुक्कराचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठवले आहे. उपवनपाल आनंद जाधव, विश्वास चोडणकर, वन अधिकारी नारायण प्रभुदेसाई व इतरांनी पाहणी करून  घटनेचा पंचनामा केला. पिळये धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ संदेश मडकईकर यांनी सुद्धा परिसरात जावून पाहणी केली.    कुळे वन विभागाचे अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी माहिती मिळाल्यानंतर परिसरात जावून पाहणी करून ८० किलो मास जप्त करण्यात आले आहे. सदर मासाचे नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर मास पाळीव की रानटी डुक्कराचे असल्याचे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून जागेच्या मालकाची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे. जिवंत असलेल्या १४ डुक्कराची रवानगी बोंडला प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आली असल्याचे सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून फोंडा, मडगाव, वाळपई, साखळी, कुडचडे व अन्य भागात रानटी डुक्कराचे मास ५०० ते ७०० रुपयामध्ये विक्री करण्यात येत होती. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता सदर डुक्कराचे मास पेटके येथून पुरवठा केले जात असल्याचा संशय होता.आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात गोव्यातील बाजारात पाळीव डुक्कराची आयात करणारी एक खास टोळी कार्यरत आहे. फोंडा येथे काही वर्षांपूर्वी कर्नाटक येथील एसटी बस मधून डुक्कराचे मास वन खात्याने पकडले होते. त्यावेळी सुद्धा सदर मास पाळीव डुक्कराचे असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते.

सरपंच बालाजी गावस यानी ह्या  संदर्भात आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की,पंचायत क्षेत्रातील युवकांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या डुक्कराची कत्तल करण्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. इतर गावातील लोक पंचायत क्षेत्रात येवून बेकायदेशीर कृत्य करीत आहेत हे बरोबर नाही. पंचायत सुध्दा याबाबत सतर्क राहणार असून ,वन खात्याने यासंबंधी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी