नारायण गावस -पणजी: राज्यात आजपासून ११ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच या पाच दिवसात ऑरेंज अलर्टही हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस लाेकांनी काळजी घेण्याचे आवाहन खात्याने केले आहे. आजही काही भागात पावसाच्या सरी पडल्या.
राज्यात मान्सून पाऊस दाखल झाला आहे पण पावसाला अजून जोर आलेला नाही अधून मधून पावसाच्या सरी येत आहेेत. पण आता हवामान खात्याने ११ जून पर्यंत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या अगाेदर गेल्या आठवड्यात राज्यात यलो अलर्ट जाहीर केला होता. यावेळी काही भागात जोरदार पाऊस झाला तर काही भागात हलक्या सरी पडल्या. पण पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस हाेणार आहे.
गेल्या २४ तासांत १.२२ इंच पाऊस -गेल्या २४ तासांत राज्यात १.२२ इंच पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक जास्त पावसाची साखळी केंद्रात नाेंद झाली असून साखळीत गेल्या २४ तासांत २.५ इच पाऊस झाला आहे. तर वाळपई केंद्रात २.३ इंच पाऊस गेल्या २४ तासांत झाला आहे. पणजी राजधानीत ०.५ इंच पाऊस झाला आहे. आजही राज्यात जाेरदार पावसाची शक्यता आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढला आहे.
सर्वाधिक पाऊस दाबोळी केंद्रावर -राज्यात १ जून ते आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस दाबाेळ केंद्रावर नाेंद झाला आहे. आतापर्यंत दाबोळी केंद्रावर एकूण ३.९ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर ओल्ड गोवात ३.७ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर राजधानी पणजीत आतापर्यंत २.९ इंच पावसाची नाेंद झाली आहे. आता पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा आणखी जोर वाढणार आहे. आज शुक्रवारीही राज्यातील बहुतांश भागात दमट तसेच ढगाळ वातवरणा होत तर काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.