- समीर नाईक
पणजी - एकोझ ऑफ अर्थ या संस्थेने नवीन वर्षात राज्यातील वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतूंच्या संवर्धनाबद्दल नव्याने जागरुकता आणली आहे. त्यांनी खास ग्रीनर साईड मोहीम आयोजित केली आहे, ज्या अंतर्गत महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये राज्याच्या विविध परिसंस्थांमध्ये खारफुटी, मधमाश्या, ड्रॅगनफ्लाय, डॅमसेल्फी, फुलपाखरे आणि पक्षी यांसारख्या अनेकदा दुर्लक्षित केलेल्या घटकांचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. कार्यक्रमात विविध उपक्रम, माहितीसत्र आणि कार्यशाळा समाविष्ट आहे. दि. १३ जानेवारी रोजी, युवा संवर्धन कृती नेटवर्कमधील स्निग्धा सहगल गोवा राज्य जैवविविधता मंडळ कॅम्पस येथे कार्यशाळेचे नेतृत्व करेल. 'सायन्स अँड स्टोरीटेलिंग इन नेचर्स लॅब’' या शीर्षकाची ही कार्यशाळा आहे, यात कथाकथन, उपक्रम आणि प्रयोगांद्वारे सहभागींना निसर्गाबद्दल शिकवेल जाईल.
दि. १४ जानेवारी रोजी, खोज आओ ही पदयात्रा होणार आहे, अॅडव्हेंचर्स गोवा या संस्थेद्वारे ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जी निसर्ग प्रेमींसाठी ऑफबीट अनुभव क्युरेट करून त्यात निसर्ग जर्नलिंगचे बारकावेही शिकवले जातील, ही पदयात्रा शिवोलीतील नदीच्या पायवाटेने होईल. दि. १८ जानेवारी रोजी मधमाशीपालनाची आवड असलेल्यांना मधमाशी पालन शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केली गेली आहे. या शैक्षणिक शो-अँड-टेल सत्राद्वारे मधमाशांचे महत्त्व, त्यांचे अधिवास, भूमिका आणि संवर्धन याविषयी माहिती दिली जाईल . ही कार्यशाळा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे असून विठ्ठल जोशी हे सत्र क्युरेट करतील.
दि. १९ जानेवारी रोजी, पर्यावरणशास्त्रज्ञ पराग रांगणेकर करमळी तलावावर फेरफटका मारताना लोकांना ड्रॅगनफ्लाय आणि डॅमसेल्फीबद्दल शिकवतील. दि. २५ जानेवारी रोजी, रांगणेकर सहभागींना पुन्हा एकदा मार्गदर्शित पदयात्रेवर घेऊन जातील, या वेळी ते गोव्याच्या जैवविविधतेमध्ये फुलपाखरांचे पर्यावरणीय महत्त्व शिकवतील, फुलपाखरांसाठी अनुकूल निवासस्थान कसे तयार करावे हे देखील या पदयात्रेत शिकवले जाणार, हा कार्यक्रम जीएसपीसीबी प्रांगणात आयोजित केला जाईल. अंतिम कार्यक्रम दि. २७ जानेवारी रोजी चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यात होणार आहे. गोवा पक्षी संवर्धन नेटवर्कचे अध्यक्ष मंदार भगत, सहभागींना ‘फेदर्स अफ्लोट: बर्डवॉचिंग इन अ बोट’ नावाच्या बोटीतून पक्षीनिरीक्षण दौर्यावर त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील विविध पक्षी प्रजातींचे निरीक्षण करण्यासाठी, गोव्यातील समृद्ध अॅव्हीफौनाविषयी माहिती देणार आहे.