- समीर नाईकपणजी - चोडण-पणजी मार्गावरील एका फेरीबोटीचा तराफा तुटल्याने जवळपास दोन तास प्रवासी अडकून पडले. तराफा तुटल्यानेच किनाऱ्यावर असून देखील फेरी बोटमधून लोकांना बाहेर येता येत नव्हते. या घटनेमुळे अनेकांना वेळेत, घरी किंवा कामावर पोहचण्यास वेळ झाला. चोडण येथील फेरीधक्क्याकडे ही घटना घडली.
मंगळवारी जवळपास दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. घटना घडल्यानंतर नदी परिवहन खात्याला या बाबत कळविण्यात आले. खात्याने लगेच कामगारांची एक टीम घटनास्थळी पाठवली, व तात्पुरती हा तरफा जोडून लोकांना फेरीबोट मधून बाहेर काढण्यात आले. या कामासाठी थोडा वेळ लागला. लोकांना बाहेर काढल्यानंतर लगेच सदर फेरिबोट दुरुस्तीसाठी नदी परिवहन खात्याच्या कार्यशाळेत पाठविण्यात आली.
सदर तराफा तुटल्याचे लक्षात येताच स्थानीक सरपंच आणि लोकांनी तराफा निदान किनाऱ्या पर्यंत पोहचविण्यासाठी क्रेन आणली होती, परंतु क्रेनही येथे काहीच करू शकली नाही. शेवटी नदी परिवहन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी याची दुरुस्ती केली. चोडण-पणजी मार्गावर एकूण ५ फरिबोट कार्यरत असल्याने सेवा सुरू ठेवण्यास काहीच अडथळा आला नाही. बिघडलेली फेरीबोट दुरुस्तीसाठी खात्याच्या कार्यशाळेत नेण्यात आल्यानंतर संध्याकाळी ४.३० च्या सुमारास या मार्गावर दुसरी फेरोबोट उपलब्ध करून देण्यात आली.
चोडण-पणजी मार्गावर फरीबोटची अशा समस्या रोजच्याच आहे. सर्व फेरीबोटींची वेळीवेळी केल्यास अशी कुठलीही समस्या येणार नाही, याची काळजी संबंधित खात्याने घ्यावी.- अश्विन चोडणकर, चोडण
दररोज एक फरीबोट सुमारे १६ तास सातत्याने सेवा बजवित असते. शेवटी फेरीबोट एक यंत्रच आहे, त्यामुळे असे बिघाड होणे शक्य आहे. पण असे झाले तरी फेरीबोट सेवा आम्ही केव्हाच खंडित करत नाही, एक फेरीबोटला काही अडचणी येत असेल तर लगेच त्या जागी दुसरी फेरीबोट उपलब्ध करून देत असतो.- विक्रमसिंग भोसले (अधिकारी, नदी परिवहन खाते)