शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

ब्ल्यू व्हेल चॅलेंज - मुलांची काळजी घ्या, गोवा पोलिसांचं पालकांना भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 11:19 AM

ऑनलाइन गेमपासून मुलांना दूर ठेवत त्यांची काळजी घ्या असा सल्ला पोलिसांनी पालकांना दिला आहे

ठळक मुद्देगोवा क्राईम ब्रांचने गुरुवारी हे पत्रक जारी केलं आहे'मुलं ऑनलाइन असताना काय सर्च करत आहेत याची माहिती घ्या. त्यांचे मेसेज, कॉल्स, फेसबूक, स्नॅपटॅच, व्हॉट्सअॅप सर्व तपासून पहा'ब्ल्यू व्हेलच्या नादात जगभरातील एकूण 100 जणांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. 

पणजी, दि. 18 - ऑनलाइन गेम ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या नादात केरळ आणि महाराष्ट्रातील एका मुलाने आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर गोवा पोलिसांनी पालकांसाठी एक पत्रकच जारी केलं आहे. दिवसेंदिवस ब्ल्यू व्हेलचा वाढता विळखा आवळत चालला असल्याचं पाहून मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. ऑनलाइन गेमपासून मुलांना दूर ठेवत त्यांची काळजी घ्या असा सल्ला पोलिसांनी पालकांना दिला आहे.  

आणखी वाचाजीवघेण्या 'ब्लू व्हेल चॅलेंज'मागे आहे रशियातील हा तरुणमुंबईत 'ब्लू व्हेल' गेमच्या नादात 14 वर्षीय मुलाची आत्महत्या ?‘त्यांचं’ भावविश्व आणि आपणक्राईम ब्रांचने गुरुवारी हे पत्रक जारी केलं आहे. मुलं वापरत असलेल्या मोबाईल आणि कॉम्प्यूटरमध्ये कंट्रोल सॉफ्टवेअर डाऊनलोड करा, जेणेकरुन मुलं काय करत आहेत यावर लक्ष राहिल असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच कमीत कमी अॅप वापरले जातील याकडेही लक्ष ठेवा असं सांगण्यात आलं आहे. 

'ज्या मुलांनी हा जीवघेणा ब्ल्यू व्हेल गेम खेळण्यास सुरुवात केली आहे, ती कदाचित नैराश्यात गेले असतील आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येण्यास सुरुवात झाली असेल. जर तुमच्या मुलाच्या वागण्यात काही बदल झाल्याचं पहायला मिळत असेल किंवा इतर काही बदल झाल्याचं वाटत असेल तर लगेच सर्च हिस्ट्री चेक करत नेमकं काय झालं आहे याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा', असा सल्ला क्राईम ब्रांचचे पोलीस अधिक्षक कार्तिक कश्यप यांनी दिला आहे. 

'मुलं ऑनलाइन असताना काय सर्च करत आहेत याची माहिती घ्या. त्यांचे मेसेज, कॉल्स, फेसबूक, स्नॅपटॅच, व्हॉट्सअॅप सर्व तपासून पहा. यामुळे मुलं नेमका काय विचार करत आहेत याची माहिती मिळेल', असंही सांगण्यात आलं आहे. 'कमीत कमी अॅप वापरले जातील याची काळजी घ्या, सोबतच धोकादायक वेबसाईट्सपासून त्यांना दूर ठेवा', असा सल्ला देण्यात आला आहे. 

'ब्ल्यू व्हेल' या खतरनाक गेमचा रशियातील सायबेरिया प्रांतातील एका तरुणानं शोध लावला. फिलिप ब्युडेकिन नावाच्या 22 वर्षीय तरुणानं 'ब्ल्यू व्हेल' चॅलेंजची सुरुवात केली.  तरुणांना आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहन केल्यामुळे फिलिप गेल्या 3 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. या गेमच्या नादात जगभरातील एकूण 100 जणांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. 

या पत्रकातून आपल्या मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. 'तुमच्या मुलाशी ब्ल्यू व्हेल गेमसंबंधी बोला. त्यांना शाळेत किंवा इतर कोणाकडून याबद्दल ऐकलं आहे का विचारा. जर तुमचा मुलगा शाळेत या गेमबद्दल बोललं जात असल्याचं सांगत असेल तर तात्काळ शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना द्या', असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

काय आहे ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेम?ब्लू व्हेल हा एक व्हिडीओ गेम असून 2013मध्ये रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. हा गेम खेळणा-याला 50 चॅलेंजेस मिळतात. फिलिपनं लोकांसोबत विशेष करुन 20 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना टार्गेट करुन त्यांच्यासोबत ऑनलाइन संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. याद्वारे तो लोकांना स्वतःबाबत माहिती देण्यास सांगायचा, स्काइपवर त्यांच्यासोबत बोलायचा.  यावेळी तो कमकुवत लोकांची निवड करायचा. लोकांची निवड झाल्यानंतर अॅडमिन खेळाडूंना रोज एक टास्क देतात, हा टास्क 50 दिवसांमध्ये पूर्ण करायचा असतो. गेमची सुरुवात सोप्या टास्कने होते. मात्र यानंतर कठीण-कठीण टास्क दिले जातात. टास्कमध्ये हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगितली जाते.  प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या रुपात स्टोर करायचा असतो.

यामध्ये कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे, स्वत:ला इजा करून घेणे यांचा समावेश आहे. याचे चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवावे लागते, जेणेकरून दिलेले आव्हान पूर्ण होण्याची खात्री होते. अखेर पर्यवेक्षक सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान देतो. गेम डाउनलोड केला की, तो डिलिट होत नाही. वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीदेखील हॅक होण्याची शक्यता असते. एक-एक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या स्वरुपात पुरावा द्यावा लागतो त्यानंतरच खेळाडू पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो. 

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेलPoliceपोलिसMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया