सरकार बनविणार हे काँग्रेसचे दिवास्वप्न, भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 08:39 PM2018-03-26T20:39:01+5:302018-03-26T20:39:01+5:30
सरकार बनविणार हे काँग्रेसचे दिवास्वप्न आहे. काँग्रेसने राज्यात सरकार बनविण्याचा विचार देखील करू नये, अशी टीप्पणी भाजपचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
पणजी - सरकार बनविणार हे काँग्रेसचे दिवास्वप्न आहे. काँग्रेसने राज्यात सरकार बनविण्याचा विचार देखील करू नये, अशी टीप्पणी भाजपचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे दोन दिवस गोव्यात होते. त्यांनी दिल्लीला परतताना राज्यातील भाजप सरकार निश्चितच कोसळेल असे म्हटले आहे. तो संदर्भ देऊन बोलताना सावईकर म्हणाले, की मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये नेतृत्वाविषयीचा कोणताही वाद नाही. र्पीकर यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असून त्यांची स्थिती सुधारत आहे. ते शक्य तेवढय़ा लवकर गोव्यात परततील आणि विविध कामे पुढे नेतील. राज्यात काँग्रेसचे सरकार येणारच नाही. त्यामुळे त्याविषयीचा विचार देखील त्या पक्षाने करू नये. काँग्रेसने कुणाचीच दिशाभुल करू नये.
सावईकर म्हणाले, की र्पीकर यांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी तीन मंत्र्यांची समिती नेमण्याची व्यवस्था केली. ती व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत आहे. केंद्र सरकारने गोव्यातील खनिज खाणप्रश्न गंभीरपणो घेतलेला आहे. गेल्या 2क् रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात आले होते व त्यावेळी त्यांनी खाणप्रश्नी जे निर्णय घेतले, त्यांचा पाठपुरावा सध्या सुरू आहे. मंत्र्यांच्या समितीने वकिलांचे पॅनलही निश्चित करण्याविषयी चर्चा केली आहे. पुढील आठवडय़ात देशाच्या अॅटर्नी जनरलांकडे सल्लामसलतीसाठी विषय जाईल असे आपल्याला वाटते. त्यानंतर खाणप्रश्नी कृती योजना ठरेल.
भाजपतर्फे विविध दिन
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विविध दिवस साजरे करण्याचे काम पक्षाला दिले आहे. त्यानुसार येत्या दि. 14 एप्रिलला सामाजिक न्याय दिन पक्षातर्फे पाळला जाईल. 18 रोजी स्वच्छ भारत दिवस, 2क् रोजी उज्जवला दिन, 24 रोजी पंचायतराज दिवस, 3क् एप्रिल रोजी स्वास्थ्य दिवस, 2 मे रोजी किसान कल्याण दिन तर 5 मे रोजी कौशल्य भारत दिन साजरा केला जाणार आहे, असे सावईकर यांनी स्पष्ट केले.