- वासुदेव पागीपणजी - हवमानात झालेल्या आकस्मिक बदलामुळे आकाशात ढगनिर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेने वर्तविल आहे.
सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आकाश ढगाळ असणार आहे. तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारा वाहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पावसाची शक्यता ओळखून पिवळा अलर्टही जारी करण्यात आला आहे.
नैऋत्य मान्सून परतल्यामुळे आता हवामान कोरडे झाले आहे. दिवस तापत आहेत तर रात्री तापमान कमी राहत आहे. पणजीत दिवसा ३४.८ इंच पर्यंत तापमान वाढले होते. सामान्य प्रमाणापेक्षा १.८ अंश सेल्सीयसने हे अधिक राहिले. तसेच रात्री तापमान २१.५ अंशपर्यंत खाली घसरले. साान्य तापमानापेक्षा शनिवारी वास्को येथे कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा २.१ अंश सेल्सिअसने ते अधिक उतरले होते.
आजपासून धुकेपाऊस संपून हिंवाळा ऋतू लागतो तेव्हा प्रत्यक्ष थंडी पडण्यापूर्वी थंडी पडणार अशल्याचे संकेत मिळू लागतात. दाट धुके पडू लागले की गुलाबी थंडीचे दिवस जवळ असल्याचे ते संकेत असतात. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २९ ऑक्टोबरपासून धुके पडण्याची शक्यता आहे.