पणजी: महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी गोवा देशात पाचव्या क्रमांकावर असून सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम ही राज्ये पहिल्या चार क्रमांकावर आहेत. डिसेंबर २०२३ च्या नोंदीनुसार गोव्यात महागाई दर ३.२४ टक्के असल्याचे केंद्रीय सांख्यिकी आणि अमंबजावणी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या सिक्कीममध्ये महागाी दर हा २.८१ टक्के, नागालँड २.८८ टक्के,, अरूणाचल प्रदेश २.९९ टक्के आणि मिझोरामचा दर आहे ३.२९ टक्के इतका आहे. सर्वाधिक महागाई ही मणीपूरमध्ये १२.८६ टक्के इतकी आहे.
त्यानंतर ओरिसा राज्याचा क्रमांक लागत असून या राज्यात ८.७३ टक्के इतका दर आहे. मोठ्या राज्यांतही परिस्थिती फारसी चांगली नाही. महाराष्ट्र ६.०८ टक्के, मध्यप्रदेश ५.१५ टक्के, आंद्र प्रदेश ५.५२ टक्के, राजस्थान ६.९५ टक्के, कर्नाटक ५.६३ टक्के, पंजाब ५.९५ टक्के असे प्रमाण आहे. केंद्रीय सांख्यिकी खात्यातर्फे दर महिन्याला किरकोळ महागाई दराचा अहवाल जाहीर केला जातो. सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात भाजीपाला आणि कडधान्य महागले होते. त्यामुळे महागाईचा दर उंचावला.