नारायण गावस, पणजी: राज्यात १ जून ते १४ जून पर्यंत १५.३२ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत सर्वांत जास्त पाऊस काणकोण केंद्रावर नोेंद झाला आहे. काणकोणात आतापर्यंत २७.७ इंच पावसाची नाेंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल मडगावात २०.७ इंच पावसाची नाेंद झाली आहे. हवामान खात्याने १७ व १८ जून रोजी राज्यात पुन्हा यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या २४ तासात राजधानी पणजीत सर्वात जास्त २.६५ इंच पावसाची नाेंद झाली आहे. तर मुरगावात ७.०७ इंच व वाळपईत १.८ इंच तर मडगावात १.६५ इंच पावसाची नाेंद झाली आहे. गेल्या २४ तासांत इतर केंद्रापेक्षा राजधानीत सर्वात जास्त पाऊस झाला आहे. काल गुरुवारी दिवसभर ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडल्या आज सकाळी काही भागात पावसाच्या सरी पडल्या तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
राज्यात यंदा उत्तर गाेव्यापेक्षा जास्त पाऊस दक्षिण गोव्यात झाला आहे. दक्षिण गोव्यातील काणकाेण मडगाव या केंद्रावर सर्वात जास्त पाऊस झाला आहे. तर उत्तर गाेव्यात पेडणे वाळपई केंद्रावर कमी पाऊस आतापर्यंत नाेंद झाला आहे. आता पुढील दाेन दिवस हवामान खात्याने पुन्हा यलो अलर्ट जारी केल्याने जाेरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.