शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

गोव्यात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवा, मगोपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 1:14 PM

मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा अशी स्पष्ट मागणी प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) शनिवारी येथे केली.

पणजी : मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा अशी स्पष्ट मागणी प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) शनिवारी येथे केली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमध्ये आहे. 

मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने व त्यांना प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी आपल्याकडील बहुतांश खाती अन्य सर्व मंत्र्यांमध्ये वितरित करावी असे ठरवले आहे.  मनोहर पर्रीकर हे दिल्लीला एम्स संस्थेमध्ये पुढील उपचारांसाठी निघण्यापूर्वी कांदोळी येथील इस्पितळात शनिवारी सकाळी सभापती प्रमोद सावंत आणि भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तिथे राजकीय स्वरुपाची चर्चा झाली. लोबो यांनी त्या भेटीनंतर लोकमतला सांगितले, की मनोहर पर्रीकर हे त्यांच्याकडील अतिरिक्त खाती मंत्र्यांमध्ये पुढील 48 तासांत वितरित करतील. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तसे सांगितले आहे. मनोहर पर्रीकर यांच्याकडे अर्थ, गृह या खात्यांसह उद्योग, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, वन, पर्यावरण, सहकार, पर्सनल, सर्वसाधारण प्रशासन अशी विविध खाती आहेत. 

मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांना लोकमतने अतिरिक्त खाते वाटपाविषयी प्रतिक्रिया विचारली असता, ढवळीकर म्हणाले, की र्पीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा. सरकारचे काम सुलभपणे व चांगल्या प्रकारे चालावे म्हणून मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपविणो गरजेचे आहे. 

ढवळीकर यांनी मगोपचे दुस-या पक्षात विलीनीकरण कोणत्याच अटीवर केले जाणार नाही असेही स्पष्ट केले. विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही असे ते म्हणाले. दरम्यान, मगोपचे नेते असलेले सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळात सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा सोपविण्यास गोवा  फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांचा आक्षेप आहे, अशी  माहिती राजकीय सुत्रांकडून मिळाली. मंत्री सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डकडे तीन आमदार असून त्या तिन्ही आमदारांकडे मंत्रीपदे आहेत. मगोपकडेही तीन आमदार असून त्या तीनपैकी दोघांकडे मंत्रीपदे आहेत.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर