- वासुदेव पागी पणजी - हमास इस्रायल युद्धाच्या पार्श्वभुमीवर भारतातील इस्रायली संस्थांना सुरक्षा देण्यात आली आहे त्यात गोव्यातील छबाड हाऊसचाही समावेश आहे. यहुदींची प्रार्थनास्थळे असलेल्या गोव्यातील छबाड हाऊसना आवश्यक सुरक्षा देण्यात आल्याची माहिती गोवा पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे.गोव्यात एकूण यहुदींची ३ प्रार्थनास्थळे, म्हणजे छाबडा हाऊज आहेत. त्यातील हणजुणे व मोरजी येथे एक एक आहेत तर काणकोणमधील पाळोळे किनारा भागात एक आहे. हणजुणे व मोरजी येथील छाबडा हा सध्या बंद आहेत, परंतु काणकोणमध्ये चालू आहे. या छाबड हाऊसमध्ये शनिवार व रविवार असे दोन दिवस प्रार्थना होत असते. त्यामुळे या छबाड हाऊजला अधिक सुरक्षा द्यावी लागते.
गोव्यात या पर्यटन हंगामात सरासरी २४०० साली नागरीक येतात. त्यातील एखाद दुसरा पर्यटक दीर्घ व्हिसा घेऊन आलेला असतो. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला नसल्यामुळे यावेळी इस्रायली नागरीक गोव्यात तसे कमीच आहेत.