- नारायण गावस
पणजी: गोवा शिपयार्ड लिमिटेडतर्फे शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ साठी शिष्यवृत्ती पुरस्कारांसाठी गोवा राज्यात राहणाऱ्या एस/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहे. यात डिप्लोमा (अभियांत्रिकी फार्मसी हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी एक विद्यार्थ्याला प्रती वर्ष रक्कम ७५०० दिली जाणार आहे. एकूण १५ विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
तसेच अभियांत्रिकी (बीई/बीटेक/) फार्मसी बी फार्मा) आर्किटेक्चर (बी आर्च) या अभ्यासक्रमासाठी प्रती वर्षे एका विद्यार्थ्याला १४ हजार दिले जाणार आहे. एकूण १० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार. एबीबीएस, दंतचिकित्हा, हॉमियोपॅथी, आयुवेर्दिक या अभ्यासक्रमासाठी २१ हजार एकूण १० विद्यार्थ्यांना मिळणार, बीएसी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ८५०० एकूण १० विद्यार्थ्यांना मिळणार, तर अलाईड हेल्थ सायन्स यासाठी प्रती वर्ष ७ हजार एकूण ५ विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.
एस/एसटी/ओबीसीच्या विद्यार्थी जे गोवा राज्याचे रहिवासी आहेत आणि गोव्यात शिक्षण घेत आहेत. त्यांनी www.goashipyard.in येथे करिअर पृष्ठावरील अर्ज फॉर्ममध्ये प्रवेश करू शकतात अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०२४ आहे.