- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - दक्षिण गोव्यातील रविवार १७ डिसेंबर रोजी वीज खात्याने जाहीर केलेला नियोजित शटडाऊन काही अपरिहार्य कारणासाठी पुढे ढकलला आहे. वीज खात्याने त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
देखलभालीच्या कामासाठी वीज खात्याने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजे दरम्यान दक्षिण गोव्यातील काही भागांमध्ये खंडीत वीज पुरवठा केला जाईल असे नागरिकांना कळवले होते. मात्र आता वीज खात्याने आता हा नियोजित शटडाऊन पुढे ढकला असून पुढील तारीख लवकरच कळवली जाईल असे नमूद केले आहे.
दरम्यान वीज खात्याकडून नियमितपणे वीज वाहिन्या, ट्रान्फॉर्मर आदींची देखभाल हाती घेतली जाते. त्यादृष्टीने नागरिकांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना पूर्वकल्पना दिली जाते. जेणे करुन नागरीकांना आपली घरगुती कामे आटोपता येतील. त्यानुसार १७ डिसेंबर रोजीचे शटडाऊनची नोटीसही वीज खात्याने मागील आठवडयात जारी करुन त्याची माहिती नागरिकांना दिली होती.