पणजी: गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या मंगळवारी २८ रोजी दुपारी ४.३० वाजता जाहीर केला जाणार आहे.
गोवा बोर्डाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडल्यानंतर इयत्ता दहावीच्या परीक्षा गेल्या २१ मे पासून घेण्यात आल्या होत्या. १९,११५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सीमा बंद राहिल्याने शेजारी महाराष्ट्रातील गोव्यात दहावीचे शिक्षण घेणाऱ्या १९० विद्यार्थ्यांकरीता महाराष्ट्रात सीमाभागात परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. कर्नाटकातील ३३ विद्यार्थ्यांसाठीही अशीच त्या भागात परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली होती. विशेष गरजा असलेल्या २४१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. १०१ विद्यार्थ्यी या ना त्या कारणाने परीक्षेस बसू शकले नाहीत. यातील बरेच जण लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकले होते.