पणजी : गोव्यात विद्यार्थ्यांमध्ये डिहायड्रेशन दिसून आल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता दर दुसºया आणि सहाव्या पिरीयडनंतर पाणी पिण्यासाठी दोन मिनिटांची सुट्टी दिली जाणार आहे. केरळमध्ये ही पध्दत सुरु झाल्यानंतर दक्षिण भारतात तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा राज्यांनीही ही पध्दत अवलंबिली आहे.
शिक्षण खात्याने यासंबंधीचे परिपत्रक काढले असून राज्यातील सर्व शाळा, विद्यालयांना पाठवले आहे. विद्यार्थी वर्गात असताना पुरेसे पाणी पित नाहीत त्यामुळे डिहायड्रेशन होऊन त्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दर दुसºया आणि सहाव्या पिरीयडनंतर बेल वाजवून पाणी पिण्याकरिता दोन मिनिटांसाठी ब्रेक द्यावा, असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित तसेच बिगर अनुदानित प्राथमिक, मिडल स्कूल, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळांनाही हा आदेश लागू असल्याचे शिक्षण खात्याचे उपसंचालक शैलेश शेणवी झिंगडे यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत पिण्यायोग्य शुध्द पाण्याची सोय करावी लागणार आहे. वर्ग सुरु झाल्यानंतर
डिहायड्रेशनमुळे काय होते?
शरिराला पाण्याची गरज असते. पुरेसे पाणी न पिल्यास लहान मुलांमध्ये आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ओठ सुकणे, ओठांना भेगा पडणे, लघवीचा रंग बदलणे, लघवी न होणे, त्त्वचा थंड अथवा कोरडी पडणे, अतिनिद्रा, रडू आले तरी अश्रू न येणे आदी गोष्टी दिसून येतात. उन्हाळ्यात किंवा उकाड्यामुळे जास्त घाम आल्यास, उलट्या किंवा अतिसारामुळे तसेच सतत लघवी झाल्यास शरिरातील पाण्याची प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होते.