नारायण गावस
पणजी: राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी पणजीत कमाल तापमान ३४.५ अंश झाले होते तर मुरगावात कमाल तापमान ३४.२ अंश नाेंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापेक्षा यंदा १ अंशाने तापमान वाढले आहे.
गेल्या आठवड्यात राज्यात कमाल तापमान ३३.५ होते तर कमाल तापमान २७ अंश नाेंद करण्यात आले होते. पण आता पुन्हा ते १ अंशाने वाढले आहे. पुढील आठ दिवस हे तापमान असेच स्थिर राहणार असल्याने लोकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यंदा मार्च एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा ३४ अंशावर गेला होता. आता मे महिन्यात तो ३४.५ ते ३५ अंशावर गेला आहे. आता पुढे यात आणखी वाढ हाेऊ शकते. या कडाक्याच्या उष्णतेमुळे लाेकांना बाहेर फिरणे असाहाय्य झाले आहे.
वाढत्या उष्णतेच्या बचावासाठी लोकांनीही आता दुपारी १२ ते ३ पर्यंत खुल्या उन्हात बाहेर पडणे टाळले आहे. आराेग्य खात्याने या वेळी बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे लोकांना हृदय विकार डोकेदुखी पोटात मळमळ उलटी तसेच अन्य इतर लहान माेठे आजार जडले आहेत. बहुतांश लाेक आता मसालेदार अन्न न खाता साधा फळाहार व भाजांचा आहार घेत आहे.