शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

Goa: पर्यटकहो, गोव्यात प्लास्टिक बाटल्या,  पाउच खरेदी करताना यापुढे सावधान!

By किशोर कुबल | Published: August 09, 2023 11:35 PM

Goa Tourism : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी आता खबरदारी बाळगावी लागणार असून यापुढे गोव्यात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पाउच मधील द्रव्य पदार्थ, चिप्स किंवा इतर वस्तूंची प्लास्टिक पाकिटे खरेदी करताना ठराविक ठेव दुकानदाराकडे जमा करावी लागेल.

- किशोर कुबल 

पणजी -  गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी आता खबरदारी बाळगावी लागणार असून यापुढे गोव्यात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पाउच मधील द्रव्य पदार्थ, चिप्स किंवा इतर वस्तूंची प्लास्टिक पाकिटे खरेदी करताना ठराविक ठेव दुकानदाराकडे जमा करावी लागेल. 'जिवाचा गोवा' करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही हा भुर्दंड बसणार आहे.

गोवा विधानसभेत बुधवारी रात्री उशिरा ह यासंबंधीचे कायदा दुरुस्ती विधेयकविधेयक संमत करण्यात आले. ग्राहकांनी दुकानदारांकडून प्लास्टिक बाटली किंवा प्लास्टिक पाकिटामधील वस्तू घेतली, तर त्याला त्याचे अतिरिक्त पैसे विक्रेत्याला द्यावे लागतील. प्लास्टिक बाटलीसाठी ठेव रक्कम पाच ते दहा रुपयांपर्यंत असू शकते, असे संकेत याआधीच पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी दिलेले आहेत. बाटली परत केल्यानंतर ठेव रक्कम ग्राहकाला वापस मिळेल. ग्राहक प्लास्टिक बाटलीतील किंवा प्लास्टिक पाउचमधील पेय प्यायल्यानंतर रिकामी बाटली किंवा प्लास्टिक पाउच एका संकलन केंद्रावर जमा करू शकतील. ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर, ठेव रक्कम परत मिळेल. 

यासाठी काल विधानसभेत 1996 च्या गोवा नॉन बायोडिग्रेडेबल कचरा (नियंत्रण) कायदा दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले. पर्यावरण मंत्र्यांनी हे विधेयक मांडले सरकार एक एजन्सी नेमणार असून वेगवेगळ्या ठिकाणी संकलन केंद्रे उघडले जातील प्लास्टिक बाटल्या, पाकिटे यापासून होणारा कचरा रोखण्यासाठी हे विधेयक संमत करण्यात आले.

प्लास्टिक कचऱ्याची मोठी डोकेदुखी सरकार समोर निर्माण झालेली आहे. सध्या प्लास्टिक कचरा बेलिंग करून कर्नाटकच्या सिमेंट कंपनीसाठी पाठवला जातो पण ते फार खर्चिक आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख  रस्त्यांवरील प्लास्टिक कचरा घनकचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे गोळा केला जातो. दरम्यान, उत्पादक आणि आयातदार यांनाही काही रक्कम सरकारकडे आगाऊ म्हणून ठेव  भरावी लागेल. त्यासाठी संबंधित कंपन्यांकडे सरकार बोलणी करणार आहे.

दरम्यान, सरकारच्या विविध खात्यांबरोबरच, सहकारी संस्था, महामंडळे इत्यादींच्या दस्तऐवजांचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत विधेयक आणून संमत करून घेतले.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन