- नारायण गावस पणजी - रायबंदर येथेही स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने येथील रस्त्यावर वाहतूक काेंडी नित्याची झाली आहे. अगोदरच अरुंद रस्ता आहे. त्यात या रस्त्यावरील गटार तसेच नवीन पाईपलाईनसाठी खोदण्यात आल्याने सकाळ सायं. येथे वाहतूक काेंडी हाेत असते. आज सकाळी येथे माेठी वाहतूक काेंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या.
पणजी प्रमाणे रायबंदर परिसरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहे. रायबंदर ते ओल्ड गोवा हा रस्ता खूपच अरुंद आहे. या ठिकाणी माेठ्या वाहनांना बंदी आहे. मोठ्या बसेस तसेच ट्रक सारख्या वाहनांना येथे जागा मिळत नाही. त्याचप्रमाणे आता येथे रस्त्याच्या बाजूला गटाराची दुरस्ती तसेच सांडपाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी सर्व खोदण्यात आले आहेत. त्यामुळे येथे वाहतूक काेंडी हाेत असून लाेकांचा वेळही वाया जात असतो. तरीपण येथे कोणीही वाहतूक पोलीस तैनात केलेेला नाही.
हा रस्ता खोदल्याने सध्या मेरशी ते रायंबदर या महामागार्वरुन काही गाड्या जात आहेत. हा बायपास रस्ता असला तरी अनेक मोठ्या गाड्या या अरुंद मार्गावरुन जात असल्याने ही वाहतूक काेंडी वाढत आहे. चाेडण तसेच इतर रायबंदर भागातील लाेकांना या मार्गाशिवाय पर्याय नाही. पण अनेक खासगी बसेस तसेच कदंब बसेस हे या अरुंद मार्गने येत असल्याने वाहतूक काेंडी हाेत असते. तसेच सकाळ सायंकाळ पणजीत कामाला जाणाऱ्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांची गर्दी असते. तसेच मोठ्या प्रमाणात पर्यटक पणजीहून ओल्ड गोवा चर्च पहायला जाताना या रस्त्याचा वापर करत असल्याने वाहतूक काेंडी होत असते. या ठिकाणी वाहतूक़ पाेलिस तैनात करावे असे रायबंदर वासियांची मागणी आहेत.