शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Goa: मुरगावातून पहिल्यांदाच निघाली वारी, ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ च्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने

By पंकज शेट्ये | Updated: July 2, 2024 19:30 IST

Goa Pandharpur Vari News: ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ च्या गजरात मंगळवारी (दि. २) पहाटे सडा भागातून मुरगाव वारकरी संस्थेची पहिलीच वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. सुमारे १०० वारकऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. वारी पालखी, दिंडी, टाळ - मृदंगाच्या गजरात १५ जुलै रोजी पंढरपूरला पोचणार आहे.

- पंकज शेट्ये वास्को - ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ च्या गजरात मंगळवारी (दि. २) पहाटे सडा भागातून मुरगाव वारकरी संस्थेची पहिलीच वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. सुमारे १०० वारकऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. वारी पालखी, दिंडी, टाळ - मृदंगाच्या गजरात १५ जुलै रोजी पंढरपूरला पोचणार आहे.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या पत्नी नगरसेविका श्रद्धा आमोणकरही उपस्थित होत्या. मुरगाव मतदारसंघाच्या सडा भागातून पहिल्यांदाच वारी पंढरपूरला निघाली असून हा ऐतिहासिक क्षण पाहण्याची संधी मिळाल्याने आम्ही भाग्यवान असल्याचे ते म्हणाले. वारकरी पंढरपूर गाठण्यासाठी दररोज ३० किलोमीटर अंतर चालणार आहेत. दररोज पहाटे २० किलोमीटर अंतर पार केले जाईल. दुपारी जेवण करून पुन्हा १० किलोमीटरचे अंतर गाठून विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा वारीला सुरुवात होणार आहे. वारीसोबत वैद्यकीय सुविधा, जेवणाची आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था असल्याची माहिती देण्यात आली. पंढरपूरला निघालेले वारकरी ४०० किलोमीटरचे अंतर पार करणार आहेत.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर कडूनही शुभेच्छासडा येथून निघालेली वारी वास्को येथे पोहोचल्यावर ग्रामदैवत देव दामोदराचे दर्शन घेण्यात आले. तेथे आमदार कृष्णा साळकर, त्यांच्या पत्नी नगरसेविका शमी साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, वास्को भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक आणि अनेक भक्तांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तालुक्यातून पहिल्यांदाच पंढरपूरला जाण्यासाठी वारीचे आयोजन केल्याने हा एक आनंदाचा क्षण असल्याचे साळकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPandharpur Wariपंढरपूर वारी