पणजी- महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण अस्तित्वात आल्यानंतर आता शिवसेनेनं गोव्यातही असा प्रयोग होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली आहे. गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असून, विजय सरदेसाईंनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. त्यामुळे गोव्याचे उपमुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई संपर्कात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांच्या भेटीनंतर विजय सरदेसाईंनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे.फक्त घोषणा करून सरकार बदलत नसतं. ते सगळं अचानकच होतं. महाराष्ट्रात जे झालं तसा प्रयोग गोव्यातही केला पाहिजे. सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही संजय राऊतांची भेट घेतलेली आहे. 'महा विकास आघाडी' तयार झालेली आहे. ती गोव्यापर्यंतही विस्तारायला हवी, असंही ते म्हणाले आहेत.
भाजपासाठी धोक्याची घंटा; गोव्यातील बड्या नेत्यालाही खुणावतोय 'महाविकास आघाडी'चा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 2:01 PM