शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

गोवा: धबधबेही ठरले जीवघेणे! आता धबधब्यांवरही नेमणार जीवरक्षक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 6:26 PM

गोव्यात पर्यटकांचे आकर्षण ठरलेले धबधबेही जीवघेणे ठरले आहेत. शनिवारी साखळीनजीक हरवळे धबधब्यावर लष्करी जवानाचा बुडून मृत्यू झाला.

पणजी : गोव्यात पर्यटकांचे आकर्षण ठरलेले धबधबेही जीवघेणे ठरले आहेत. शनिवारी साखळीनजीक हरवळे धबधब्यावर लष्करी जवानाचा बुडून मृत्यू झाला. अलीकडेच दुधसागर धबधब्यावर मुलुंड, मुंबई येथील एक युवक बुडाला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील धबधब्यांवरही जीवरक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शनिवारी पणजीतील लष्करी इस्पितळातील मूळ तामिळनाडू येथील जवान पेरीस्वामी मरीमुट्टू हा हरवळे येथे बुडून मृत्यू पावला. पाण्याचा अंदाज नसल्याने गोव्यात धबधब्यांच्या ठिकाणीही पर्यटकांचे बुडून मृत्यू पावण्याचे प्रकार वाढल्याने पर्यटन खात्याने गंभीर दखल घेतली आहे. मंत्री बाबू आजगावकर म्हणाले. अनेकदा जीवरक्षक समुद्रात उतरु नका, असा सल्ला देत असतात परंतु मद्यधुंद पर्यटक तो धुडकावून समुद्रात उतरतात आणि आपले प्राण गमावून बसतात. 

मुंबईची दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनी गोव्याच्या किना-यांवर जीवरक्षकाचे काम करते. हे जीवरक्षक आता  केवळ किनाºयांपुरतेच मर्यादित न राहता धबधबे तसेच पाणथळ असलेल्या अन्य पर्यटनस्थळांवरही नेमले जाणार आहेत. मंत्री आजगांवकर म्हणाले की, हरवळे येथील या धबधब्यावर ही दुर्घटना घडली तेथे पाण्यात उतरण्यासारखीसारखी स्थिती नव्हती. सध्या गोव्यात विकएंडच्या सलग सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झालेली असून  किनारे, धबधबे याठिकाणी मोठी संख्या दिसून येत आहे. उत्सवाच्या निमित्ताने मिळालेल्या सलग सुट्टीचा पर्यटकांनी लाभ घेतला हे बरेच  परंतु  गोव्यात आल्यानंतर  अशा ठिकाणी स्वत:ची काळजी घेणे  महत्त्वाचे आहे, असे मंत्री आजगावकर यांनी स्पष्ट केले. 

जीवरक्षक किंवा पोलिसांनी दिलेले इशारे किंवा निर्देश पर्यटकांनी त्या त्या पर्यटनस्थळांवर पाळावयाचे आहेत, असे ते म्हणाले. गोव्यात येणाºया पर्यटकांनी चांगल्या स्मृती घेऊनच आपल्या गावात परतावे, अशी पर्यटन खात्याची सदिच्छा आहे. पर्यटकांनी येथे स्वत:ची काळजी घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.  किना-यांवर 600 जीवरक्षक!दृष्टि लाइफ सेविंग कंपनी किना-यांवर जीवरक्षकाचे काम करायला लागल्यापासून किना-यांवर बुडून मृत्यू पावण्याच्या घटना ९९ टक्क्यांनी घटल्याचा तसेच ३ हजारहून अधिक जीव वाचविल्याचा दावा केला जात आहे. राज्यातील ३८ किना-यांवरील तब्बल ४0 पॉइंटसवर सुमारे ६00 जीवरक्षक तैनात आहेत. ३५ टॉवर्स किना-यांवर आहेत. २00८ पासून किनाºयांवर जीवरक्षक तैनात केलेले आहेत. गत साली २0१६ मध्ये ४0५ पर्यटकांना वाचविले त्यात ३१९ देशी तर ८६ विदेशी होते. यावर्षी जुलैपर्यंत १६६ पर्यटकांना वाचविले त्यात १३0 देशी व ३६ विदेशी होते, असे सांगण्यात आले.