- पूजा नाईक प्रभूगावकर पणजी - शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची आपल्याला जाणीव आहे. आता त्रास होतच असल्याने ३१ मे पर्यंत लोकांनी कळ सोसावी असे पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूशे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लाेकांना व्यवस्थित वाहने चालवण्यास मिळत नाही. यामुळे काही जण पडून जखमी झाले, तर एकाला आपला जीव गमवावा लागला. याची कल्पना आपल्याला आहे. ३१ मे ही सर्व कामे पूर्ण करण्याची डेडलाईन आहे. या डेडलाईन मध्ये कामे पूर्ण झालीच पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाबूश म्हणाले, की स्मार्ट सिटीची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण व्हावीत यावर भर दिला जात आहे. या कामांमुळे शहरात काही ठिकाणी अपघात घडले. खरे तर योग्य ते संरक्षण उभारुन ही कामे करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. मात्र काही ठिकाणी कंत्राटदाराने ते केले नाही. या कामांचा लोकांना त्रास होत आहे. अपघात होत आहेत, धुळ प्रदुषण होत आहे. हे आपल्याला मान्य असून त्याची जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.