पणजी: अरबी समुद्रावर घोंगावणाऱ्या चक्रीय वाऱ्यामुळे किनारी लगतच्या भागात वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
चक्रीय वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. लाटाही उंच उसळत आहेत. ताशी ४० ते ५५ किमी पर्यंत वेगाने वारा सुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न उतरण्याचा इशारा खात्याने केले आहे.
वर्षाची सुरूवातच यंदा पावसाच्या सरींनी झाली होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक ठइकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या होत्या. आताही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन घडामोडींमुळे राज्यातील थंडी कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारी पणजीत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस होते. तर किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस असे नोंद झाले आहे.