मडगाव - एअर कार्गो पॉलिसीमुळे गोव्याला ब-याच नफा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या योजनेचा लाभ गोवेकरांनी करुन घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. मोपा येथे एक्सपॉर्ट हबही उभारले जाणार आहे. त्याचाही लाभ गोवेकरांना होईल असे ते म्हणाले. गोव्याला खाण प्रश्न सतावित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देउ अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आज रविवारी मडगावच्या एसजीपीडीए मार्केटात एक्सपोर्ट इन्प्सेक्शन काउन्सिल वाणिज्य आणि औदयोगिक मंत्रलय भारत सरकार तसेच एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी मुंबईच्या नवीन उपकार्यालय तसेच प्रयोगशाळा संकुलाचे प्रभू यांच्या हस्ते उदघाटन झाले. या प्रयोगशाळेत मालाची चाचणी होउन सर्व निकष पुर्ण झाल्यास या मालाला निर्यात प्रमाणपत्र मिळेल ज्याला जगभरात मान्यता असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोव्याचे नगरनियोजनंमत्री विजय सरदेसाई, आरोग्यमंत्री विश्वजीत राणो, मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष बबिता प्रभूदेसाई, एफडीए गोवाच्या संचालिका डॉ. ज्योती सरदेसाई , डॉ. एच. के. सक्सेना एसजीपिडीएच्या अध्यक्षा रेणुका दा सिल्वा आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपलब्ध होत्या.गोव्यातील पुरातत्व विभागाचे लवकरच डिजिटायलेशन करु असेही आश्वासन प्रभू यांनी दिले. चिखली येथील इस्पितळ एअर ऑथॉरेटी ऑफ इंडियाच्या अख्यत्यारीत आणण्यासाठी प्रयत्न करु, त्यासंबधी बैठका घेतल्या जाईल असे ते म्हणाले. मडगावच्या एसजीपिडीए मार्केटात सुरु करण्यात येणारी प्रयोगशाळा ही अदयावत असेल.मासे हे येथील लोकांच्या आहारातील प्रमुख घटक होय. त्यांनाच चांगल्या दर्जाची मासळी उपलब्ध असावी. लोकांना दर्जेदार अन्न मिळणो गरजेचे आहे.या प्रयोगशाळेत केवळ मासळीच नव्हे तर फळे, दुध आदींचीही तपासणी केली जाईल. एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीच्या प्रयोगशाळेच्या दर्जाबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. जपान देश हा कुठलाही माल निर्यात करताना त्याची विशेष खबरदारी घेतली जाते.एक साधीतरी चूक आढळल्यास हा देश माल स्वीकारत नाही. या प्रयोगशाळेतून जपानसह अन्य देशात पुरवठा केलेल्या मालांची तपासणी केली जाते असे ते म्हणाले. सरकार लोकांच्या आरोग्याप्रती जागृत आहे. आम्हाला निर्यातदरही वाढविला पाहिजे. सदया 321 बिलियन माल निर्यात होतो. भविष्यात तो नक्कीच वाढेल. मासेही मोठया प्रमाणात निर्यात केले जातात. गोव्यासाठी ते एक वरदानच ठरेल. एअरकार्गो योजनेमुळे गोव्याला आपला बाजारपेठ विस्तारीत करण्यासाठी चांगलीच संधी उपलब्ध होईल. येथे रोजगारांचाही सुविधा उपलब्ध होतील असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे न्यु इंडिया हे मिशन आहे, या मिशनमुळे अनेक संधी उपलब्ध होणार आहे, त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. देशात तेरा राज्य किनारपटटीभागत मोडत आहेत. काही राज्ये सोडल्यास येथे प्रयोगशाळा नाहीत. गोव्यात आता अशी प्रयोगशाळा उभी रहात आहेत असे त्यांनी सांगितले.नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी आपल्या विरोधकांचा चागलाच समाचार घेतला. आज या प्रयोगशाळेचा कोनशिलाचे अनावरण होत असल्याचे बघून आपल्याला आनंद होत आहे असे ते उदगारले.मार्च महिन्यार्पयत ही प्रयोगशाळा सुरु होईल असे ते म्हणाले. गोव्यात मासळीतील फॉर्मेलिन प्रकरणाचा विरोधकांनी मोठा बाउ केला होता. कृत्रिमरित्या हा प्रश्न निर्माण करुन मासळी खाणोच नको अशी स्थिती झाली होती. मासळी म्हणजे विष असे सरकारला आव्हान देण्यात आले होते. गोव्यात राहिणीमान उच्च दर्जाचे आहे. येथील दरमाही उत्त्पनही चांगले आहे. या पाश्र्वभूमीवरुन लोकांची अपेक्षाही खूप आहेत. पुर्व किनारपटटीभागातून मासळी येत होते, त्यात फॉर्मेलिन असल्याचे बाउ झाला. निद्रिस्त काँग्रेसला आयताच एक विषय हाती गवसला. ते झोपेतून जागे झाले. काँग्रेसचे प्रभारी मार्केटमध्ये पोहचले, त्यांनी मासळीची चाचणी घेतली. आता आम्ही गोव्यात मत्स्य महोत्सव आयोजित करु व त्यांना निंमत्रित करु असे ते म्हणाले. आम्ही सर्वजण एकसंध आहोत. सरकारपुढे आव्हाने येणार, आम्ही एकत्र राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. गोवेकरांना जर हा सरकार न्याय देत असेल तर आम्हीही या सरकारबरोबर आहोत. येथील मासळी मार्केटचा दर्जा उत्तम आहे.मुबंई महानगरपालिकेनेही हा मार्केट बघितला आहे.गिरीश चोडणकर यांना आता फॉर्मेलिन इश्यू लोकसभेसाठी हवा होता. आज हा इश्यु नाही. तो मला व सुरेश प्रभू यांना शाप घालीत असावा असे सरदेसाई म्हणाले. सत्कारत्मक विचार पाहिजे. लंडनमध्ये ब्रे्क्ङिाट आहे तर येथे गोयकारपण आहे. पुढील भवितव्य गोव्यातच आहे. गोव्यातच ते व्हायला पाहिजे. सर्वानी सहभागी व्हायला पाहिजे. पुर्वीच्या सरकारच्या कालावधीत सांकवाचे तरी काम झाले होते का असा सवाल उपस्थित करुन आज 20 हजार कोटींची विकासकामे सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. फॉर्मेलिन इश्यु नाही तर खुपजणांना त्रस होणार , त्यांच्याकडे इश्यूच असणार नाहीत. सकारात्म विचार घेउन पुढे या जर आमचे चुकत असेल तर आम्हच्यावर दोषारोप करा. मासळी मार्केट मॉर्डन करु असे सांगतानाच गोव्यातील पुरातत्व विभागाचे डिजिटलायझेशन करण्याचीही मागणी त्यांनी केली.आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या भाषणात कुठल्याही कामाला विघ्नसंतोष आणणो ही काहीजणांची मनस्थितीतच आहे. आपण व विजय सरदेसाई हे नेहमीच एकत्र राहू, लोकांचा हिताचे निर्णय घेउ त्याबाबत कुठलाही समझोता नाही असे त्यांनी सांगितले. विजय सरदेसाई ही विकासभिुमुख असामी आहे.विरोधक पाय ओढण्याचे प्रयत्न करतात, आम्ही एकसंध राहण्याची गरज आहे.आपण ही हमी देतो. सरकार विकासकामांसाठी प्रयत्नशील आहेत. अन्नसुरक्षेबाबत कुठलाही समझोता नाही. एफडीएचेही पुर्ण सहकार्य असेल अश्ी ग्वाहीही राणो यांनी यावेळी दिली. चिखली येथील इस्पितळाबाबतही तोडगा काढू असे ते म्हणाले.दक्षिण गोवा विकास प्राधधिकरणाच्या अध्यक्षा रेणुका दा सिल्वा यांचेही भाषण झाले. डॉ. एच. के. सक्सेना यांनी स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी प्रयोगशाळेबाबत माहिती दिली. यापुर्वी गोव्यातील काजू निर्यातीची प्रयोगशाळेत चाचणी झाली. मडगावातील प्रयोगशाळा मार्च महिन्यार्पयत कार्यन्वीत होईल असे ते म्हणाले. सानू जेकब यांनी आभार मानले.या कार्यक्रमापुर्वी मंत्री सुरेश प्रभू यांनी मडगावच्या किरकोळ मासळी विक्री मार्केटाचीही पहाणी केली. या मार्केटचा दर्जा व येथील सुविधेबददल त्यांनी गौरवोदगार काढले. यावेळी प्रभू यांच्या हस्ते नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई व दक्षिण गोवा विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षा रेणुका दा सिल्वा याही उपस्थित होत्या.