शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, काँग्रेसवर नामुष्की

By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 10:15 AM

goa zp election results : सोमवारी जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे.

ठळक मुद्देगोव्यातील दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ४९ पैकी ३२ जागांवर मिळवला विजयमुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ ४ जागांवर मानावे लागले समाधान आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते उघडताना एका जागेवर मिळवला विजय

पणजी - एकीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे देशभरात भाजपाविरोधात असंतोष वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे विविध राज्यांत होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी यश मिळत असल्याने भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. काल जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे. गोव्यातील दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ४९ पैकी ३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष बाब म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते उघडताना एका जागेवर विजय मिळवला.गोव्यातील ४८ जिल्हा परिषद क्षेत्रात ५० जागा आहेत. मात्र एका ठिकाणी उमेदवाराचे निधन झाल्याने तिथे मतदान झाले नव्हते. जिल्हा परिषदेसाठी १२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवला. तर सात ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला चार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ आणि एनसीपी आणि आम आदमी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला.या निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रथमच खाते उघडले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष गोव्यामध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागांवर उमेदवार उभे करण्याचे लक्ष्य समोर ठेवून वाटचाल करत आहे. गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत.दरम्यान, गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या निकालांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ग्रामीण मतदारांनी भाजपाचे नेतृत्व आणि राज्य सरकारवर विश्वास दर्शवला आहे, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप