पणजी : दोन ब्रिटिश अल्पवयीन मुलींशी आॅनलाइन आगळीक केल्या प्रकरणी फ्रान्सिस परेरा (३0) या गोमंतकीय युवकाला लंडनमध्ये १५ महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फ्रान्सिस याने या युवतींशी आॅनलाइन संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचाही प्रयत्न केला. त्यांची अश्लिल रेखाचित्रे सोशल मीडियावर टाकली. इस्लेवर्थ क्राउन कोर्टमध्ये सोमवारी त्याला तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली. या मुली १२ वर्षांच्या असूनही त्यांच्याशी लैंगिक संवाद साधला. या प्रकरणी वेगवेगळ्या चार गुन्ह्यांसाठी अनुक्रमे ३ महिने व १५ कैद त्याला फर्मावण्यात आली. सोशल मीडियावर लहान मुलांच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करुन या अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचार करणा-यांवर वुल्फ पॅक हंटर्स या स्वयंसेवी गटाने पर्दाफाश केलेला आहे. या मुली आपल्या कौटुंबिक मैत्रिणी असल्याचा बचाव संशयिताने घेतला परंतु कोर्टाने हा बचाव फेटाळून लावला.
गेल्या २९ डिसेंबर रोजी लंडनमधील एका बसस्थानकावर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास या अल्पवयीन मुलींना भेटण्यासाठी जाण्याच्या तयारीत असता त्याला पकडण्यात आले आणि नंतर पोलिसांनी रितसर अटकही केली. डिसेंबरमध्येच फ्रान्सिस याने या मुलींशी सलगी केली. या मुलींनी आपण अल्पवीन असल्याची कल्पना देऊनही त्याने लैंगिक संवाद साधला. आपल्या गुप्तांगाचे फोटो त्यांना पाठवले आणि वर असेही लिहिले की, हे फोटो तुमच्या मातेला दाखवू नका, नपेक्षा तुम्ही त्रासात पडाल’.
हा गुन्हा केवळ काल्पनिक आहे. प्रत्यक्षात आपल्या अशिलाने कोणताही गुन्हा केलेला नाही, असा बचाव फ्रान्सिस याच्या वकिलाने घेतला परंतु तो फेटाळण्यात आला. फ्रान्सिस याचे परदेशात नातेवाईक आहेत