शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

गोव्याचे दक्षता खाते बिनकामाचे, तब्बल १0२ प्रकरणे चौकशीसाठी पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 1:59 PM

दक्षता खात्याचे तपासकाम कासवगतीने चालू असल्याचे आकडेवारी नजरेखालून घातली असता दिसून आले. सुमारे बारा ते पंधरा वर्षांपूवीर्ची प्रकरणेही अजून निकालात येऊ शकलेली नाहीत. त्यामुळे दक्षता खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पणजी : दक्षता खात्याचे तपासकाम कासवगतीने चालू असल्याचे आकडेवारी नजरेखालून घातली असता दिसून आले. सुमारे बारा ते पंधरा वर्षांपूवीर्ची प्रकरणेही अजून निकालात येऊ शकलेली नाहीत. त्यामुळे दक्षता खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एखाद्या सरकारी अधिकाऱ्याविरूद्ध किंवा राजकारण्याविरुद्ध दक्षता खात्याकडे प्रकरण पोहोचले आणि चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचे काय झाले, याची उत्सुकता सर्वसामान्य लोकांना असते आणि त्याबाबत जाणून घेण्याची जिज्ञासाही वाढते.

आकडेवारी असे सांगते की, तब्बल १0२ प्रकरणे चौकशीसाठी खात्याकडे पडून आहेत आणि यात २00५ च्या प्रकरणांचाही समावेश आहे. लाचलुचपतविरोधी विभागाकडे ४६ प्रकरणे चौकशीसाठी आहेत तर सर्वसाधारण दक्षता विभागाकडे ५६ प्रकरणे आहेत. कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचाही यात समावेश आहे. सुमारे साडेपाच कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता केल्याचा आरोप कवळेकर यांच्यावर आहे. चालूवर्षी आतापर्यंत ११ प्रकरणे दक्षता खात्याकडे आली. २00६ ची दोन , २0१२ ची पाच तर २0१५ ची सात प्रकरणे चौकशीसाठी पडून आहेत. लाच मागणे किंवा स्वीकारणे, बेकायदेशीरपणे भूखंड बळकावणे, बोगस प्रमाणपत्रे देणे तसेच अधिकाराचा गैरवापर करून अन्य माध्यमातून पैसे उकळणे, आदी आरोप आहेत. अव्वल कारकुनांच्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याचा आरोप काही जणांवर आहे.तत्कालीन बंदर कप्तान ए. पी. मास्कारेन्हस, मडगाव पालिकेचे माजी मुख्याधिकारी यशवंत तावडे, फोंड्याचे माजी उपजिल्हाधिकारी जयंत तारी, बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता रमाकांत देसाई आदि अधिकाऱ्यांविरूद्ध ही प्रकरणे आहेत.

दरम्यान, दक्षता खात्यात मनुष्यबळाचा अभाव हेदेखिल प्रमुख कारण मानले जाते. मध्यंतरी दक्षता संचालकांनी याचा उल्लेख करुन लांच लुचपतविरोधी विभागासाठी जादा निरीक्षकांच मागणी केली होती. अधिकृत माहितीनुसार असेही आढळून आले आहे की, लांच लुचपत प्रकरणांमध्ये या विभागापेक्षा गोवा पोलिस तसेच आरटीओ अधिकाºयांनीच अधिक गुन्हे आजवर नोंद केलेले आहेत.

अलीकडेच आयपीएस अधिकारी विमल गुप्ता यांच्याविरुदचे भ्रष्टाचाराचे प्रकरण दक्षता खात्याकडे सोपविण्याची मागणी झाली होती परंतु ते करण्याऐवजी गुप्ता यांनी कोणतीही चौकशी न करता थेट दिल्लीला बदली करण्यात आली. दुसरीकडे २0१८ अखेरपर्यंत दक्षता खात्याकडील किमान ५0 टक्के प्रकरणे निकालात काढली जातील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे. क आणि ड श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांची १६0 प्रकरणे निकालात काढल्याचा दावाही त्यांनी केला होता.