पणजी : गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या सागरी शिखर परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्हर्च्युअल पध्दतीने परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेस महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
मुंबईत एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेली ही शिखर परिषद पुढील तीन दिवस चालणार आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले कि,‘ नील क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांपासून खलाशांपर्यंत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जहाज बांधणीत मुख्यमंत्री म्हणाले कि, गोव्याचे मरिटाइम क्षेत्र आर्थिक विकासाभिमुख, नाविन्यपूर्ण व कनेक्टिव्हीटी देणारे आहे. जहाज बांधणीपासून दुरुस्ती, क्रुझ पर्यटन, सागरी प्रशिक्षण ते बंदराभिमुख औद्योगिकरण या सर्व बाबतीत राज्य सरकारचे योगदान महत्त्वाचे आहे. जगभरातील ३० हुन अधिक राष्ट्रांकडे गोव्यातील सागरी ‘गेट वे’ मुळे व्यापारी संबंध आलेले आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ), नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ पोलार रीसर्च, नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ वॉटर स्पोर्टस आदी महत्त्वाच्या संस्था गोव्यात आहेत. अधिकाधिक आव्हाने पेलून मरिटाइम क्षेत्रात देशाचा विकास घडवून आणण्यासाठी आमच्याकडे पुरेशी यंत्रणा आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा शिपयार्डने जहाज बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तटरक्षक दल, मुरगांव बंदराला हे शिपयार्ड सहकार्य करीत आहे. जहाजांमधून येणाय्रा पर्यटकांची संख्या गोव्यात वाढत आहे. गोवा प्रमुख लॉजिस्टिक व क्रुझ टर्मिनल म्हणून उदयास येत आहे. केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गोवा किनारपट्टी मल्टिमॅाडेल मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावे. फेरी सेवा, तरंगत्या जेटींमुळे राज्यात जलमार्ग कनेक्टिव्हिटी वाढणार असून त्यामुळे पर्यटनही बहरणार आहे.’