शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गोव्याचा दुधसागर धबधबा अखेर खुला; पर्यटकांची लगबग

By किशोर कुबल | Published: October 12, 2023 12:59 PM

पर्यटकांच्या पसंतीचे स्थान असलेल्या गोव्यातील दुधसागर धबधब्यावर आजपासून पुन्हा लगबग सुरु झाली.

पणजी : पर्यटकांच्या पसंतीचे स्थान असलेल्या गोव्यातील दुधसागर धबधब्यावर आजपासून पुन्हा लगबग सुरु झाली. पावसाळ्यानंतर हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.जुलैमध्ये मैनापी, नेत्रावळी धबधब्यावर बुडून दोघांवा अंत झाल्यानंतर धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घातली होती. त्यानंतर कमी धोक्याचे काही धबधबे खुले केले. दुधसागर धबधबा खुला झाला नव्हता.

पावसाळ्यात पर्यटकांची गोव्याच्या धबधब्यांवर मोठी गर्दी असते. १६ जुलै रोजी प्रसिध्द दुधसागर धबधब्यावर प्रवेश नाकारलल्याने हजारो पर्यटक अडकले. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीबरोबर संतापाचे वातावरण पसरले होते. वन खात्याने अभयारण्ये तसेच वन क्षेत्रातील धबधब्यांवर प्रवेशास बंद घातली होती.

पावसाळ्यात दुधसागर धबधब्यावर विहंगम दृष्य असते. गोव्याहून लोंढ्याकडे जाणारी रेलगाडी या धबधब्याजवळून जाते. लाखो पर्यटक पावसात या धबधब्याला भेट देत असतात. राज्यात हरवळे तसेच अन्य ठिकाणीही धबधबे आहेत. परंतु दुधसागरला पर्यटकांची विशेष पसंती असते.दरम्यान, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गांवकर यांनी पर्यटकांना धबधब्यावर नेणाय्रा जीपचालकांना शिस्त पाळण्याचे व जबाबदारीने वागण्याचे आवाहन सुरु केले आहे. धबधब्यावर पर्यटकांची काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.