मडगाव - गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट.. देशातील तब्बल दोन लाख गायकांच्या आवाजातून गोव्यातील उभरती गायिका गौतमी हेदे बांबोळकर हिचा आवाज ‘बिग गोल्डन व्हॉयस’ टॉप टेनमध्ये स्थान मिळविणारा ठरला असून या आवाजाची पारख भारतीय फिल्मी गायिकीतला गोल्डन व्हॉयस म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनू निगम यांनी केली आहे.बिग एफएमने आयोजीत केलेल्या बिग गोल्डन व्हॉयस सीझन -2 या राष्ट्रीय स्तरावरील रेडिओ शो साठी गौतमीची निवड झाली असून या स्पर्धेसाठी ती सध्या मुंबईत आहे. उद्यापासून ही स्पर्धा सुरु होणार असून त्या स्पर्धेचे परिक्षण स्वत: सोनू निगम करणार आहेत. या शोसाठी ज्या दहा गायिकांची निवड झाली आहे त्यात मंगळुरुच्या पल्लवी प्रभू या आणखी एका कोंकणी गायिकेचा समावेश असून ती कर्नाटक राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. याशिवाय या स्पर्धेत प. बंगाल, गुजरात, झारखंड, उडीशा, हरियाना व आग्रा येथील स्पर्धकांचा समावेश आहे.बीग एफएमतर्फे मागची पाच वर्षे ही स्पर्धा घेतली जात असून यंदाचे हे सहावे वर्ष आहे. रेडिओच्या माध्यमातून देशभरातील गायक स्पर्धकांचे आवाज या स्पर्धेसाठी पाठविले जातात. या स्पर्धेतील गोव्यातील विजेती असलेल्या गौतमीचा आवाजही असाच पाठविला गेला होता. सोनू निगम यांच्या पारखणीत तो उजळ ठरल्याने सध्या तिला टॉप टेनमध्ये स्थान मिळाले.आतार्पयत असंख्य गीतांचे कार्यक्रम करणारी आणि हजार जैतां, रे दामोदरा, मोगा म्हज्या यासारख्या अनेक आल्बममध्ये गीते गायिलेल्या गौतमी हिने गुणाजी या कोंकणी चित्रपटासाठीही प्ले बॅक सिंगिंग केले होते. गोवा राज्य स्पर्धेत तिला त्यासाठी पुरस्कारही प्राप्त झाला होता. आता या राष्ट्रीय स्पर्धेत पात्र ठरल्याने आपल्याला खचितच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया गौतमी हिने मुंबईहून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दोन लाख गायक स्पर्धकांमधून पहिल्या दहामध्ये स्थान मिळविणो आणि सोनू निगमसारख्या गायकाकडून मार्गदर्शन लाभणो ही माङयासाठी लाखमोलाची संधी असून त्याचा लाभ घेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन असे ती म्हणाली.
‘बिग गोल्डन व्हॉइस’ स्पर्धेत गोव्याची गौतमी टॉप टेनमध्ये, दोन लाख स्पर्धकांतून झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 5:38 PM