शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

गोव्याचा हॉटेल उद्योग सावरेल पण शॅक व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:16 PM

एक हजार रुपयांपेक्षा जास्त आणि साडेसात हजार रुपयांर्पयत मर्यादित ज्या हॉटेलांचे भाडे आहे, अशा हॉटेलांना पूर्वी 18 टक्के जीएसटी होता.

पणजी : वस्तू व सेवा कर मंडळाने हॉटेलच्या खोल्यांवरील जीएसटीचा दर 12 टक्क्यांर्पयत खाली आणल्यामुळे गोव्यातील हॉटेल व्यवसायिक समाधान व्यक्त करू लागले आहेत. मंदीच्या काळात आता गोव्याचा हॉटेल उद्योग सावरेल पण पर्यटन व्यवसायाचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग असलेला शॅक व्यवसाय मात्र संकटात आला आहे. हे संकट दूर करणो सध्या तरी गोवा सरकारच्या हाती नाही.गोव्याचा पर्यटन हंगाम येत्या दि. 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

एक हजार रुपयांपेक्षा जास्त आणि साडेसात हजार रुपयांर्पयत मर्यादित ज्या हॉटेलांचे भाडे आहे, अशा हॉटेलांना पूर्वी 18 टक्के जीएसटी होता. तो आता 12 टक्के झाला आहे. तसेच एक हजार रुपयांर्पयत ज्या हॉटेलांचा खोली भाडेदर आहे, त्यांना जीएसटीमधून पूर्ण मुक्ती देण्यात आली आहे. गोव्यातील हॉटेल व्यवसायिकांनी जीएसटीविरुद्ध मोहीमच सुरू केली होती. अगोदरच गोव्यात जास्त पैसा खर्च करणा:या पर्यटकांचे येणो कमी झाले आहे व त्यात जीएसटीच्या भारामुळे आपला हॉटेल धंदा अडचणीत आल्याची तक्रार व्यवसायिक करत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जीएसटीचा दर कमी करून गोव्यातील हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा दिला. मात्र गोव्याच्या किना:यांवर दरवर्षी जे शॅक (पर्यटन गाळे) लाखो पर्यटकांची खाद्य व प्येयाची हौस  भागवतात, त्या शॅक व्यवसायिकांचा वेगळा लढा सध्या सुरू झालेला आहे. गोव्याची किनारी क्षेत्र व्यवस्थापन योजना वेळेत तयार न झाल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने शॅक धोरणाला स्थगिती दिली आहे. किना:यांवर शॅकना सध्या परवाने देता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

काही शॅक व्यवसायिकांनी यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. किना:यांवर सुमारे पाचशे शॅक दर पर्यटन मोसमावेळी उभे केले जातात. त्यासाठी पर्यटन खात्याकडून परवाना घेतला जातो. गोवा सरकारच्या शॅक धोरणाला लवादाने स्थगिती दिल्याने सरकार परवाना देऊ शकत नाही. परिणामी किना:यांवर यावेळी ऑक्टोबर महिन्यात तरी शॅक उभे राहण्याची शक्यता अंधूक बनू लागली आहे.