पणजी : हल्लीच संपलेल्या बीसीसीआयच्या २३ वर्षाखालील आंतरराज्य एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा रणजीपटू मोहित रेडकरने क्रिकेट लीगच्या अखिल भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात प्रथम स्थान मिळविले.
हरियाणात २७ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत ऑफ स्पीनर मोहित रेडकरने ६ सामन्यांतील ५ डावात गोलंदाजी टाकताना सर्वाधिक २० विकेट्स मिळविल्या. एकूण ४६.४ षटके गोलंदाजी करताना मोहितने ११६ धावा दिल्या. त्याने प्रत्येक विकेटसाठी सरासरी २.४८ धावा मोजल्या.
मोहितने दोन वेळा पाच गडी बाद केले. प्रथम गुजरातविरुद्ध ६- ११ तर नंतर त्रिपुराविरुद्ध ५ १३ तर छत्तीसगडविरूद्ध ४ २९ मुंबईविरुद्ध ३- ४५ आणि मणिपूरविरुद्ध २- १९ अशा विकेट्स घेतल्या.
ओडिशाविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात मोहितने गोलंदाजी केली नाही. हिमाचल प्रदेशचा रितीक कुमार ६ सामन्यांतील १८ विकेट्सनी दुसऱ्या, पंजाबचा हरजससिंग टंडन, दिल्लीचा द्विज मेहरा व अनुभव त्यागी प्रत्येकी १६ विकेट्सनी अनुक्रमे तिसऱ्या, चौध्या स्थानावर राहिले