ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.23 - जुवारी नदीवर साकारणारा नवा केबल स्टेड पुल हा जागतिक आकर्षण ठरेल, असा विश्वास केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. या पुलावर दोन टॉवर्स असतील आणि टॉवरवर रेस्टॉरंटसह प्रदर्शन सभागृहही असेल, पूर्ण गोवा टॉवरवरून पाहता येईल, असे गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी दुपारी दिल्लीस निघण्यापूर्वी शुक्रवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषद घेतली. गडकरी म्हणाले, की जुवारी पुलावर साडेतीन हजार कोटींचा खर्च येईल. केंद्र सरकार खर्चाचा भार पेलेल. पुलाचे डिझाईन तयार आहे. गोव्यात होणा:या ब्रिक्स परिषदेनिमित्ताने या राज्यात 12 कोटी रुपये खचरून सौंदर्यीकरणाचे काम केले जाईल. 1क् कोटी रुपये खचरून पर्यटक जहाजांसाठी धक्का बांधला जात आहे. सध्या गोव्यात विदेशी पर्यटकांना घेऊन पाच जहाजे येतात. नव्या धक्क्यामुळे ही संख्या पाचपटीने वाढेल व त्याचा लाभ पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग यांना होईल. मोठय़ा प्रमाणात रोजगार संधीही निर्माण होतील.
गडकरी म्हणाले, मांडवी व जुवारी या नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास गोवा सरकारने परवानगी दिलेली आहे. कॅप्टन ऑफ पोर्टचे अधिकारी जर त्यात व्यत्यय आणत असतील तर त्यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री कारवाई करतील. वास्को येथील समुद्रातील गाळ उसपण्यास राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली आहे. तथापि, तेथील 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थगितीच्या विषयाबाबत पर्यावरण मंत्रलय लवादाशी चर्चा करील. बेतुल येथे सॅटलाईट बंदर आम्ही उभे करू पाहत आहोत. गोमंतकीयांची जर त्यासाठी स्वीकृती असेल तर सरकारने मान्यता द्यावी, अन्यथा शेजारील राज्यांमध्ये आम्ही बंदरासाठी जागा पाहून ठेवली आहे. गोव्यातील मच्छीमारांना ट्रॉलर्स विकत घेता याव्यात म्हणून मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वाटप करू. यामुळे 12 सागरी मैलांच्या पलिकडेही जाऊन मच्छीमार मासेमारी करू शकतील.
मुंबई-गोवा जल वाहतूक
मुंबई ते गोवा अशी प्रवासी जल वाहतूक व्हावी म्हणून आम्ही पुढाकार घेणार आहोत. बायणा ते दोनापावल अशी फेरीसेवा लवकरच सुरू होईल. त्यासाठी निविदा जारी करून कंत्रटदारास कामाचा आदेशही देण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या राज्य सरकार दूर करील. पूर्वी गोव्यात राष्ट्रीय महामार्ग केवळ 26क् किलोमीटर लांबीचा होता. गेल्या अडिच वर्षात आम्ही गोव्याला सहाशे किलोमीटर लांबीचा महामार्ग मंजुर केला आहे. साडेसहा हजार कोटींची कामे गोव्यात सुरू आहेत. गोवा-मुंबई महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होईल, असे गडकरी यांनी सांगितले.