पणजी : एकत्रित सेवा (सीएस) कोअर बँकिंग आणि ग्रामीण माहिती आणि तंत्रज्ञान (सीसआय) या बँकेच्या तिन्ही योजनांची गोव्यात 100 टक्के अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती गोव्याचे मुख्य पोस्टमास्तर डॉ एन विनोदकुमार यांनी दिली. या तिन्ही योजनांची 100 टक्के अंमलबजावणी करणारे गोवा हे देशातील एकमेवर राज्य ठरले असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात एकूण 104 पोस्ट कचेऱ्या आहेत. कोअर बँकिंग सेवा प्रभावी व्हावी यासाठी सर्व पोस्ट कचेऱ्यात एटीएम उपलब्ध करण्यात आली आहेत. हे एटीएम बँकाच्या एटीएमसारखी नसून ती कार्ड स्वॅपिंग मशिन्ससारखी आकाराने लहान व कुठेही घेऊन जाण्यास सोयीची आहेत. त्याद्वारे लोकांना पैसे भरण्यास आणि काढण्यास सोयीचे होते. परंत पैसे मशिनमधून येत नाहीत, परंतु पोस्ट कचेरीतून दिल्या जातात. मशिनमध्ये केवळ ऑनलाईन व्यवहार केले जातात आणि व्यवहारांची पावतीही मशीनद्वारे दिली जाते.
9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर हा टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ कुमार यांनी दिली.