पणजी: गाझामधील निरपराध महिला आणि मुलांवरील हल्ले पॅलेस्टिनींच्या भावी पिढ्यांचा नाश करण्याच्या उद्देशाने होते. आम्ही इथे शांततापूर्ण परिस्थितीत एखाद्या उत्सवात भाग घेतो, तरीही जगाच्या दुसऱ्या भागात, निष्पाप मुले मृत्यू आणि विनाशाला बळी पडत आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कवी आणि लेखकांनी जुलूमशाहीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. भाषणस्वातंत्र्य कमी करू पाहणाऱ्या शक्तींविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. यासाठी गाल्फ हे निर्भय चर्चेचे व्यासपीठ बनावे, असे प्रतिपादन कवी रणजित होस्कोटे यांनी केले.
पणजीत गोवा कला आणि साहित्य महोत्सवाला (गाल्फ) सुरुवात झाली असून उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून होस्कोट उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत पद्मश्री पुरस्कार विजेते मामंग दाई, व इतर वक्ते उपस्थित होते. सध्याच्या संघर्षात मारल्या गेलेल्या अंदाजे १२ हजार पॅलेस्टिनी मुलांसाठी प्रार्थना करण्याची भावनिक विनंती देखील होस्कोट यांनी उपस्थितांना केली.भेद मान्य केले पाहिजेत. आपण एक वैविध्यपूर्ण राष्ट्र आहोत. गाल्फ सारखे मंच आम्हाला आमच्या अदृश्य मुळांमध्ये पोहोचण्यासाठी करण्यात मदत करतात. यातून देशातील कला व साहित्य क्षेत्राला अधिक बळकटी मिळत असते, असे मत पद्मश्री पुरस्कार विजेते मामंग दाई यांनी व्यक्त केले.
या वर्षी गाल्फ कलाकृती २४ वर्षीय गोमंतकीय कलाकार सागर नाईक मुळे यांनी बनवली आहे, अलीकडेच स्थानिक लाल माती आणि एक अनोखी, पारंपारिक शैली वापरणाऱ्या "कावी कला" साठी पंतप्रधानांनी सन्मानित केले होते. दरम्यान सागर नाईक मुळे यांच्या या कलाकृतीचे अनावरण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांच्याहस्ते करण्यात आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रख्यात अनुवादक आणि लेखक, जेरी पिंटो यांच्या 'जीव दिवू का च्या मारू' या दामोदर मावझो यांच्या कोकणी कादंबरीचा नवीनतम अनुवाद "बॉय, अनलव्हड" या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.