शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

गोमंतकीयानो जागे व्हा: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जबरदस्तीने लादलेले प्रकल्प भविष्यातील पिढ्यांना घातक

By सूरज.नाईकपवार | Published: January 06, 2024 12:27 PM

गोव्यातील भाजप सरकार भांडवलदारांना खूश करण्यासाठी गोव्याचा नाश करण्याच्या तयारीत आहे.

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेवर्क, मडगाव: मोपा विमानतळ, आयआयटी, फिल्म सिटी, 3 लिनियर प्रोजेक्ट, स्मार्ट सिटी, थीम पार्क, ओल्ड गोव्यातील घोस्ट घरे,मरिना तसेच जबरदस्तीने लादलेले इतर प्रकल्प आपल्या भावी पिढ्यांना घातक ठरतील. गोमंतकीयांनी आताच शहाणे होवून भाजप सरकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये. गोंमंतकीयानो जागे व्हा असे आवाहन  गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.

दाबोळी विमानतळावरील व्यवसायातील तीव्र घट, जुन्या गोव्यातील घोस्ट घरांना दिलेला क्रमांक, पेडणे येथील थीम पार्कसाठी दिलेली हरित जागा, निसर्गरम्य रिवण आणि काणकोण येथे आयआयटी आणि फिल्म सिटीसाठी दबाव आणण्याचे प्रयत्न, पणजी स्मार्ट सिटीच्या कामाचा गोंधळ अशा अनेक ताज्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आलेमाव यांनी गोमंतकीयांना उठा आणि गोवा वाचवीण्यासाठी पूढे या अशी आर्त हाक दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालाशिवाय तसेच गोवा आणि गोमंतकीयांना होणार्या फायदा व नुकसानाचे मूल्यमापन व मूल्यांकन न करता जो प्रकल्प लादला गेला तो विनाशकारीच ठरल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

राज्यातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार म्हणून मागील सरकारने झुआरी अॅग्रो केमिकल्सला प्रचंड जमीन सुपूर्द केली होती. आता सदर जमिनीतील शिल्लक जमिन आता रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते ज्याचा गोमंतकीयांना कोणताही फायदा नाही. या उदाहरणाचा धडा घेवून पूढे पश्चाताप करण्यापेक्षा आताच शहाणे होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

गोव्यातील भाजप सरकार भांडवलदारांना खूश करण्यासाठी गोव्याचा नाश करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण, जंगले आणि वन्यजीव नष्ट करून गोव्यावर प्रकल्प लादले जात आहेत. कमिशन आणि किकबॅक घेवून खालावलेल्या कामाच्या दर्जाच्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

टॅग्स :goaगोवा